ranveer singh bollywood actor reaction goes viral rohit sharma six mi vs gt match ipl 2022 : मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स ही मॅच मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाली. मॅच बघण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आला होता.
क्रीडा / क्रिकेटकिडा । वेबस्टोरी : खेळ
मॅचमध्ये गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्माने मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलवर शानदार सिक्सर मारला. हा फटका बघून रणवीर सिंह पण रोहित शर्माचा फॅन झाला. सिक्सर बघून रणवीरने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मुंबई इंडियन्सने मॅचच्या पॉवर प्लेमध्ये ६३ धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ६ बाद १७७ धावा केल्या. ईशान किशनने ४५ तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. टिम डेव्हिडने नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातने २० ओव्हरमध्ये ५ बाद १७२ धावा केल्या. मुंबईने मॅच पाच धावांनी जिंकली. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत १० मॅच खेळून फक्त दोन जिंकल्या आहेत. बाकीच्या आठ मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये ४ गुणांसह मुंबई इंडियन्सची टीम सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.