मुंबई: गुजरात टायटन्सला(gujrat titans) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध(lucknow supergiants) ६२ धावांनी विजय मिळवून देण्यात स्पिनर रशीद खानचा(rashid khan) मोठा वाटा होता. रशीदने ३.५ ओव्हरमध्ये ४ विकेट आपल्या नावे केले. आयपीएलध्ये रशीदची ही गोलंदाजीतील बेस्ट कामगिरी आहे. रशीदने या दरम्यान टी-२० क्रिकेटमधील ४५० विकेटही पूर्ण केल्या. क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये ४५० अथवा अधिक विकेट मिळवणाऱ्यांच्या यादीत रशीद तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातने हा सामना जिंकत १८ गुणांसह प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. rashid khan took 450 fastest wicket in t-20 cricket
अधिक वाचा - सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदी मात्री थोडी घसरली
ऑलराऊंडर ड्वायेन ब्रावोच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड आहे. ब्रावोने ५३१ सामन्यांमध्ये सर्वाधिक ५८७ विकेट घेतल्या आहेत. या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर स्पिनर इम्रान ताहीर आहे. ताहीरने ३५६ टी-२० सामन्यांमध्ये ४५१ विकेट मिळवल्यात. तर रशीदच्या नावावर ३२३ सामन्यांमध्ये ४५० विकेट आहेत. रशीदच्या निशाण्यावर आता इमरान ताहिरचा रेकॉर्ड असेल. त्याला आणखी दोन विकेट मिळवाव्या लागतील.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना ओपनर शुभमन गिलच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर निर्धारित २० ओव्हरमध्ये ४ बाद १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ संपूर्ण २० ओव्हरही खेळू शकला नाही. त्यांचा संघ १३.५ ओव्हरमध्ये ८२ धावांवर ऑलआऊट झाला.
अधिक वाचा - ... म्हणून १२ मे ला परिचारिका दिन साजरा केला जातो
रशीद खानने सध्याच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत १५ विकेट मिळवल्या आहेत. पर्पल कॅपच्या रेसमध्ये टॉप १०्ये त्याची एंट्री झाली आहे. या दरम्यान त्याने ६.७९च्या इकॉनॉमीी रेटने विकेट मिळवल्यात. तर त्याची सरासरी २१.६६ इतकी राहिली. गुजरात टायटन्स पहिल्यांदा आयपीएल खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे.