IPL 2022: रवी शास्त्री बुवांची IPL 2022 च्या विजेत्याविषयी भविष्यवाणी, सांगितलं चॅम्पियन संघाचं नाव

IPL 2022
भरत जाधव
Updated Apr 17, 2022 | 11:09 IST

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई -चेन्नई संघाची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. मुंबईला सलग सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे यंदा आयपीएल कोण जिंकणार? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर रवी शास्त्री यांनी दिले.

Ravi Shastri Buwa's prediction about the winner of IPL 2022
रवी शास्त्री बुवांची IPL 2022 च्या विजेत्याविषयी भविष्यवाणी 
थोडं पण कामाचं
  • स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत व्यक्त केला अंदाज.
  • यंदाच्या हंगामात आयपीएलचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल - शास्त्री
  • यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई -चेन्नई संघाची कामगिरी सर्वात निराशाजनक

Who Will IPL 2022 Champion  : मुंबई : आयपीएलच्या (IPL) रणसंग्रामाला सुरुवात होऊन साधरण दोन ते तीन आठवडे झाले आहेत. यंदाचा आयपीएलमध्ये मात्र दोन दिग्गज संघाच्या चाहत्यांना जबर धक्का मिळताना दिसत आहे. दोन्ही संघाचे ग्रह उलटे फिरले असल्याचं दिसत आहे, अशात भारतीय संघाचे (Indian team) माजी प्रशिक्षक (Former coach) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या विजेत्या संघाविषयी भविष्यवाणी केली आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. 

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई -चेन्नई संघाची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. मुंबईला सलग सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे यंदा आयपीएल कोण जिंकणार? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर रवी शास्त्री यांनी दिले. रवी शास्त्रींच्या मते यंदा आयपीएलचा विजेता संघ नवीन असेल. भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांच्यामते आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचेल. आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आरसीबीने दणक्यात पुनरागमन केले. रवी शास्त्री म्हणाले की, 'यंदाच्या हंगामात आयपीएलचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. निश्चित आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. आयपीएलची स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे आरसीबीची कामगिरी आणखी चांगली होईल. प्रत्येक सामन्यानंतर आरसीबीची कामगिरी सुधारत आहे. झालेल्या चुकांमधून संघ शिकत आहे, त्यामुळे आरसीबी नक्कीच प्लेऑफमध्ये पोहचेल.' 

'फाफ, कोहली आणि मॅक्सवेलची महत्वाची भूमिका 

RCB च्या फलंदाजीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की,  नवीन कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या हंगामात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. आरसीबीच्या विजयात या त्रिकुटाची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल किती धोकादायक आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. फाफही उत्कृष्ट फलंदाज आहे. जसजसे सामने पुढील जातील यांची फलंदाजी आणखी चांगली होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी