मुंबई: सनरायजर्स हैदराबादच्या(sunriders hyderabad) २२ वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने(umran malik) आपल्या वेगाने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचे(ravi shastri) मन जिंकले. मलिकचे कौतुक करताना ते म्हणाले की गोलंदाजाची गती आणि अॅटिट्यूडने प्रभावित झाले आहेत. माजी मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले, मलिक भारतीय संघाचा खेळाडू आहे आणि त्याच्यावर योग्य लक्ष दिले गेले पाहिजे. Ravi shastri make prediction about umran malik
अधिक वाचा - हे ५ प्राणी पाळल्यास घरात सुख-शांती राहते
शास्त्रींनी मंगळवार हैदराबाद आणि राजस्थान सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर सांगितले, तो सातत्याने तेज वेगाने बॉल फेकत आहे आणि मला तिचा अॅटिट्यूड आवडतो. या मुलाकडे शिकण्याची संधी आहे. त्याच्याकडे वास्तविक गती आहे. जर त्याने योग्य ठिकाणी हिट केला तर तो अनेक फलंदाजांना त्रासदायक ठरेल. ते पुढे म्हणाले, त्याला ठीक सांभाळले गेले पाहिजे. त्याला योग्य मेसेज देणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधतील ते महत्त्वपूर्ण असेल.
शास्त्रीने सांगितले मलिक भारतीय संघाचा खेळाडू आहे. माजी कोचनी सिलेक्टर्सना वेगवान गोलंदाजाला सीनियर संघाच्या जवळ राहण्यास सांगितले आहे तसेच त्याच्या प्रगतीवर सातत्याने नजर ठेवून राहायला हवी. ते म्हणाले, मलिक भारतीय क्रिकेट संघाचा भाग असू शकतो. हैदराबाद आणि राजस्थानच्या सामन्यात मलिकने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये १५० किमी प्रति तास वेगाने बॉल फेकतो. मलिकने पुणेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हरमध्ये ३ धावा देत २ विकेट मिळवल्या.
अधिक वाचा - मुंबईत मिळाले नाही घर, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची खंत
हे काही पहिल्यांदा घडलेले नाही की जेव्हा मलिकने १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. तो २०२१मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान १५३ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करत चर्चेत आला होता. मलिकला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगल्या कामगिरीमुळे २०२० या वर्षात सनरायजर्स हैदराबादचा नेट गोलंदाज म्हणून निवडून आला होता. त्याला गेल्या वर्षी टी नटराजनला कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली होती. मलिकचा जन्म २२ नोव्हेंबर १९९९मध्ये श्रीनगरला झाला होता. तो जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट टीममधून डोमेस्टिक स्तरावर खेळतो.