मंदीमध्ये रवी शास्त्रींची चांदी, वर्षाला मिळणार इतके कोटी

IPL 2019
Updated Sep 09, 2019 | 16:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी फेर नियुक्ती झाल्याच्या एका आठवड्यानंतर बीसीसीआयने रवी शास्त्री यांना मोठी खूशखबर दिली आहे. त्यांच्या आणि स्पोर्ट स्टाफच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. 

ravi  shastri
रवी शास्त्री  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक म्हणून ३ वर्षांची मुदत वाढ 
  • बीसीसीआयने त्यांना दिली २०% पगारवाढ 
  • शास्त्री भारतीय संघाचे कोच म्हणून २०२१ च्या टी-२० विश्व चषकापर्यंत राहणार 

मुंबई :  भारतात सर्वत्र मंदीची चर्चा सुरू असताना बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या मानधनात वाढ केल्याने त्यांची या मंदीतही चांदी झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तीन वर्षांची मुदत वाढत मिळाल्यानंतर आता त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  आणखी एक खुशखबर मिळाली आहे. शास्त्री यांच्या मानधनात २० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता शास्त्री यांना वार्षिक ९,५ ते १० कोटी पगार मिळणार आहे. यापूर्वी रवी शास्त्री यांना ८ कोटी रुपये वार्षिक पगार होता. 

रवी शास्त्री यांच्यासह बोलिंग कोच भारत अरूण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच त्याचे चांगले इक्रिमेंट झाले आहे. दोघांनाही वार्षिक पगार हा ३.५ कोटी रुपये मिळणार आहे. 

या संदर्भात आलेल्या बातमीत या सर्वांच्या पगारवाढीचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विक्रम राठोड यांना संजय बांगर यांच्या जागेवर बॅटिंग कोच नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना वार्षिक पगार २.५ ते ३ कोटी असणार आहे. भारतीय संघाच्या क्रमांक चारची समस्या सोडवू न शकल्यामुळे संजय बांगर यांना बीसीसीआयने सेवामुक्त केले आहे. बांगर यांनी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी याला सातव्या क्रमांकावर पाठवले, त्यामुळे भारताने हा सामना गमावला आणि फायनलचे तिकीट हुकले होते. 
 

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...