IPL Auction: आर अश्विनची अंडर-१९च्या उस्मानाबादच्या खेळाडूबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला- खरेदीवरून होणार मोठा संघर्ष

Ravichandran Ashwin | अंडर-१९ विश्वचषकात आतापर्यंतची भारतीय संघाची कामगिरी शानदार राहिली आहे. कोरोना विषाणू देखील भारतीय संघाच्या विजयरथाला रोखू शकला नाही. संघाने विजयाचा चौकार मारून उपांत्यफेरीत जागा मिळवली आहे. दरम्यान अंडर-१९ विश्वचषकात नेहमीच असे झाले आहे की, जिथे गोलंदाजी आणि फलंदाजीतून कमाल करणाऱ्या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

 ravichandran ashwin says indian under-19 team player Rajvardhan Hangargekar is the big face for ipl auction 2022
आर अश्विनची अंडर-१९ खेळाडूबाबत मोठी भविष्यवाणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंडर-१९ विश्वचषकात भारताने विजयी चौकार मारला आहे.
  • आयपीएल २०२२ च्या लिलावात आयपीएल संघामध्ये राजवर्धन हंगरगेकरच्या खरेदीसाठी संघर्ष होईल - आर.अश्विन
  • अश्विनने राजवर्धनची ईशांत शर्माशी केली तुलना.

Ravichandran Ashwin | नवी दिल्ली : अंडर-१९ विश्वचषकात (Under 19 World Cup) आतापर्यंतची भारतीय संघाची कामगिरी शानदार राहिली आहे. कोरोना विषाणू देखील भारतीय संघाच्या विजयरथाला रोखू शकला नाही. संघाने विजयाचा चौकार मारून उपांत्यफेरीत जागा मिळवली आहे. दरम्यान अंडर-१९ विश्वचषकात नेहमीच असे झाले आहे की, जिथे गोलंदाजी आणि फलंदाजीतून कमाल करणाऱ्या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. आजच्या घडीला यामध्ये दोन महत्त्वपूर्ण खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांनीही अंडर-१९ विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपले मजबूत स्थान केले आहे. (ravichandran ashwin says indian under-19 team player Rajvardhan Hangargekar is the big face for ipl auction 2022). 

अधिक वाचा : बाप अन् भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मागील काही वर्षांमध्ये अंडर-१९ विश्वचषकाच्या स्पर्धेने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) संघाना आपल्यासाठी नवीन युवा खेळाडूंना शोधण्याची संधी दिली आहे. यावेळी यावेळी देखील आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव अंडर-१९ विश्वचषकानंतर लगेचच होणार आहे. अशा स्थितीत अनेक भारतीय खेळाडूंवर आयपीएलच्या संघांची नजर असेल. त्यापैकी एक नाव भारतीय फिरकीपटू आर अश्विनने घेतले आहे. 

अधिक वाचा : अडचणी दूर व्हाव्या म्हणून सोमवती अमावस्येला करायचे उपाय

आर अश्विनच्या म्हणण्यानुसार, आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात भारतीय अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरवर (Rajvardhan Hangargekar)सर्व फ्रँचायझींची नजर असेल. त्याने राजवर्धनच्या गोलंदाजीची तुलना भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्माशी केली. त्याने असा दावा केला की त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेमुळे तसेच शेवटच्या काही षटकांमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या राजवर्धनच्या संदर्भात संघांमध्ये संघर्ष होऊ शकतो. 

राजवर्धन शानदार इनस्विंग करतो - अश्विन

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, "आयपीएल लिलावादरम्यान या खेळाडूला नक्कीच खरेदी केले जाईल. कोणती फ्रँचायझी खरेदी करेल हे मी सांगू शकत नाही. मात्र त्याला नक्कीच विकत घेतले जाणार हे निश्चित असून या खेळाडूचे नाव आहे राजवर्धन हुंगरगेकर. तो अतिशय अचूक इनस्विंग गोलंदाजी करतो. सध्याच्या कालावधीत भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये ही कला फक्त इशांत शर्माच्या गोलंदाजीत पाहायला मिळते."

'पॉवर हिटर' देखील आहे राजवर्धन

त्याने आणखी सांगितले  “सामान्यतः इनस्विंग चेंडू फलंदाजाला दबावात ठेवतो आणि त्याला मोठे फटकार मारण्याची संधी मिळत नाही. टी-२० फॉरमॅटमध्ये हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याच वेळी राजवर्धन क्रमवारीत शेवटच्या काही फळीत उतरतो आणि मोठे फटकेही मारतो. यामुळे मला वाटते की, भारतीय अंडर-१९ संघातील या खेळाडूला खरेदी करण्यासाठी अनेक संघ आयपीएल लिलावात रस दाखवतील आणि त्याच्या नावावर निश्चितच लढत होईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी