CSK ला मोठा धक्का ! आयपीएल मॅचदरम्यान जडेजाने सोडलं कर्णधारपद

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated Apr 30, 2022 | 19:47 IST

Ravindra Jadeja resigns as CSK captain : CSK ने IPL 2022 मध्ये सातत्याने खराब कामगिरीमुळे पहिल्या 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे हंगामाच्या मध्यात रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे.

Ravindra Jadeja handed back the captaincy of CSK to MS Dhoni, big announcement of CSK
CSK ला मोठा धक्का ! आयपीएल मॅचदरम्यान जडेजाने सोडलं कर्णधारपद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रवींद्र जडेजाने सीएसके कर्णधार पद सोडले
  • पु्न्हा MS धोनीच्या खांद्यावर जबाबदारी
  • CSK ची मोठी घोषणा

मुंबई : CSK चा नवा कर्णधार रवींद्र जडेजाने IPL 2022 मध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने 8 सामन्यांत 6 पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. (Ravindra Jadeja handed back the captaincy of CSK to MS Dhoni, big announcement of CSK)

अधिक वाचा :RR vs MI Playing 11: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची अशी असू शकते प्लेइंग XI 
CSK च्या प्रेस रिलीजनुसार "रवींद्र जडेजाने अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला CSK चे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने CSK चे नेतृत्व मोठ्या हितासाठी केले आहे. जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू द्या."

अधिक वाचा :

Happy B'day Rohit Sharma : टीम इंडियाचा हिटमॅन झाला 35 वर्षांचा, जाणून घ्या त्याचे 10 मोठे रेकॉर्ड

महेंद्रसिंग धोनीने सीझन 15 सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला 8 पैकी 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळवला, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा पराभव करून जिंकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी