मुंबई: क्रिकेटबाबत काही चाहते इतके वेडे असतात की ते आपल्या क्रिकेट टीमसाठी वा क्रिकेटर्ससाठी काहीही करण्यास तयार असतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या(royal challengers bangalore) चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. सध्या विराट कोहली संघाचा कर्णधार नाही मात्र या फ्रेंचायझीच्या लोकप्रियतेचे मोठे श्रेय त्यालाच जाते. आरसीबीने आतापर्यंत एकदाही आयपीएलचा(ipl) खिताब जिंकलेला नाही. मात्र चाहते त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका महिला चाहतीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. यावर स्पिनर अमित मिश्राने(amit mishra) प्रतिक्रिया दिली आहे. RCB fan photo viral on social media
अधिक वाचा - हनुमान जयंतीच्या दिवशी करू नका ही ५ कामे, नाहीतर पडतील भारी
काही दिवसआधी एक क्रिकेट चाहतीने पोस्टरवर लिहिले होते की जोपर्यंत विराटच्या शतकाचा दुष्काळ संपत नाही तोपर्यंत ती कोणालाही डेट करणार नाही. तर आता मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. येथे एक महिला चाहती बॅनरच्या माध्यमातून सांगत होती की, जोपर्यंत आरसीबीची संघ आयपीएल ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही.
पाहता पाहता या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या मागचे कारण हे ही होते की चेन्नई सुपर किंग्से या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवत हंगामातील पहिला विजय मिळवला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अनुभवी स्पिनर अमित मिश्राने प्रतिक्रिया देताना लिहिले, या मुलीच्या आई-वडिलांची खूप काळजी वाटते.
Really worried about her parents right now.. #CSKvsRCB pic.twitter.com/fThl53BlTX
— Amit Mishra (@MishiAmit) April 12, 2022
अनेक क्रिकेट चाहत्यांनी आपापल्या शैलीत या चाहतीच्या फोटोवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले ही खूप खेदाची बाब आहे की ही मुलगी कधी लग्न करू शकणार नाही तर एका चाहत्याने म्हटलेय की ही मुलगी कदाचित २००८ पासून या बॅनरसोबत फिरत आहे.
अधिक वाचा - बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत एकदाही खिताब जिंकलेला नाही. विराट कोहलीने फ्रेंचायझीसोबत कोणताही खिताब जिंकू देऊ न शकल्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.