IPL 2021: हर्षल पटेलचा मोठा रेकॉर्ड, मात्र...

IPL 2021
Updated Oct 12, 2021 | 16:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१मध्ये मोठा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने एका हंगामात सर्वाधिक ३२ विकेट घेण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

kkr vs rcb
IPL 2021: हर्षल पटेलचा मोठा रेकॉर्ड, मात्र... 

थोडं पण कामाचं

  • हर्षल पटेलने सध्याच्या सीझनमध्ये ५६.२ ओव्हर गोलंदाजी केली.
  • यात त्याने ८.१४च्या सरासरीने ४५९ धावा दिल्या.
  • २७ धावांमध्ये ५ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

दुबई: रॉयल चॅलेंज बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१मध्ये ३२ विकेट मिळवल्या. आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात ही एखाद्या भारतीय गोलंदाजाची सगळ्यात चांगली कामगिरी आहे. मात्र त्यांच्या संघाला आयपीएलमध्ये आपले स्थान कायम राखता आले नाही. एलिमिनेटरच्या सामन्यात केकेआरने त्यांना हरवले आणि विराटचा संघ आयपीएलबाहेर गेला. या सामन्यात हर्षलने १९ धावा देत दोन विकेट मिळवल्या आणि रेकॉर्ड बनवला. यूएईमध्ये होणाऱ्या टी-२०वर्ल्डकपसाठीही या ३० वर्षीय गोलंदाजाला टीम इंडियामध्ये जागा मिळालेली नाही. 

हर्षल पटेलने आयपीएल २०२१मध्ये १५ सामने खेळताना १४च्या सरासरीने ३२ विकेट मिळवल्या. एखाद्या हंगामातील एखाद्या क्रिकेटरची ही जबरदस्त कामगिरी आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या ड्वायेन ब्रावोने २०१३मध्ये गी कामगिरी केली होती. त्याने ३२ विकेट मिळवल्या होत्या. 

२७ धावांत ५ विकेट

हर्षल पटेलने सध्याच्या सीझनमध्ये ५६.२ ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने ८.१४च्या सरासरीने ४५९ धावा दिल्या. एकदा चार तर एकदा ५ विकेट मिळवल्या. २७ धावांमध्ये ५ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिकही घेतली होती. असे करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता. 

बंगळुरूचा पराभव

कोलकाता नाईट रायडर्सने शारजा येथे प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत स्थान मिळवले. बेंगळुरूलाही हा सामना जिंकता आला असता पण त्यांनी चूक केली. पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनेही ती चूक सांगितली.शारजाच्या खेळपट्टीवर शेवटच्या षटकांमध्ये फलंदाज नेहमीच डगमलेले दिसतात आणि तेच घडले.

डेथ ओव्हर्समध्ये, जेव्हा विराटने आपल्या गोलंदाजांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचा परिणाम दिसून आला. डावाच्या 18 व्या षटकात मोहम्मद सिराजने फक्त 3 धावा देत 2 गडी बाद केले. कोलकाताने 127 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या आणि त्यांना 12 चेंडूत 12 धावांची गरज होती. यानंतर, 19 व्या षटकात, जॉर्ज गार्टन देखील दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाला. त्याने फक्त 5 धावा दिल्या. कोलकात्याला शेवटच्या षटकात फक्त 7 धावांची गरज होती.ही शेवटची ओव्हर डॅन ख्रिश्चनलाही द्यावी लागली कारण कदाचित विराटने त्याच्या गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. कारण जर त्या एका षटकात 22 धावा मारल्या नसत्या तर बेंगळुरू हा सामना सहज जिंकू शकला असता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी