MI vs DC IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांचा निर्णय शनिवारी मुंबई इंडियन्सच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयाने झाला. मुंबई इंडियन्सच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले. दरम्यान मुंबईच्या विजयाने आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुंबईच्या विजयात आरसीबीचे खेळाडू नाहून गेल्याचे पाहायला मिळेल. (RCB players danced with the victory of Mumbai Indians).
अधिक वाचा : औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राजकारणासाठी जिवंत
आयपीएल २०२२च्या प्लेऑफची परिस्थिती अशी होती की शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने विजय मिळवून आरसीबीला खुशखबर दिली. मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून दिल्लीवर मात केली. हा सामना पाहणाऱ्या आरसीबीच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह त्यांचे खेळाडू प्लेऑफची भेट मिळताच आनंदाने नाचू लागले.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकात विजय मिळवला. विजय मिळताच आरसीबीच्या खेळाडूंनीही आनंदाने उड्या मारल्या.
मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला झाला आणि संघाने चौथा संघ म्हणून त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. दिल्लीच्या संघाने सांघिक खेळी केली मात्र त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले.
प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाकडून ईशान किशन (४८ धावा, ३५ चेंडू) आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस (३७ धावा, ३३ चेंडू) यांनी पाच चेंडू राखून पाच गडी राखून सामना आपल्या नावावर केला.