कोच रिकी पॉटिंगने या खेळाडूवर केला गैरवर्तणुकीचा आरोप

IPL 2021
Updated Apr 06, 2021 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंडियन प्रीमीयर लीगच्या १४व्या हंगामाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले की पृथ्वी त्याचे काही ऐकत नाही. गेल्या सत्रात जेव्हा पृथ्वी शॉ खराब स्थितीतून जात होता तेव्हा नेट्सवर फलंदाजी करण्यास त्याने नकार दिला. 

pointing-shaw
कोच रिकी पॉटिंगने या खेळाडूवर केला गैरवर्तणुकीचा आरोप 

थोडं पण कामाचं

  • चेन्नईमध्ये ९ एप्रिलपासून आगामी आयपीएलला सुरूवात होत आहे.
  • इंडियन प्रीमीयर लीगच्या १४व्या हंगामाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले की पृथ्वी त्याचे काही ऐकत नाही.
  • आयपीएलचे १४ चे सत्र ९ एप्रिलपासून सुरू होणार असून चेन्नईमध्ये पहिली लढत होत आहे.

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा मु्ख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने युवा सलामीवीर पृथ्वी शॉबाबत काही खुलासे केले आहेत. इंडियन प्रीमीयर लीगच्या १४व्या हंगामाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले की पृथ्वी त्याचे काही ऐकत नाही. गेल्या सत्रात जेव्हा पृथ्वी शॉ खराब फॉर्मात होता तेव्हा त्याने नेट्सवर फलंदाजी करण्यास नकार दिला होता. 

पॉंटिगने अशीही आशा व्यक्त केली की याप्रतिभावान फलंदाजाने आगामी स्पर्धेआधी सुधारणेसाठी आपल्या ट्रेनिंगच्या सवयीत सुधारणा केल्या असतील. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्या दोन सत्रापासून २१ वर्षीय पृथ्वी शॉबरोबर काम करत आहे. यावेळी त्याने आठवण करून दिली की पृथ्वी शॉ जेव्हा खराब फॉर्मात होता तेव्हा नेट्सवर फलंदाजी करण्यास त्याने नकार दिला होता. 

चेन्नईमध्ये ९ एप्रिलपासून आगामी आयपीएलला सुरूवात होत आहे. याआधी पाँटिंग म्हणाला, गेल्या वर्षी आपल्या फलंदाजीबाबत पृथ्वीचा वेगळाच काहीतरी फॉर्म्युला होता. जेव्हा तो धावा करत नसेल तेव्हा तो नेट्सवर फलंदाजी करणार नाही आणिजेव्हा तो धावा करत असेल तर त्याला नेट्सवर फलंदाजी करायची असते. त्याने चार अथवा पाच सामन्यात १० पेक्षा कमी धावा केल्या. मी त्याला सांगत होतो की आपल्याला नेट्सवर गेले पाहिजे आणि पाहिले पाहिजे की नेमकी काय समस्या आहे. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला मी फलंदाजी करणार नाही. 

आयपीएलचे १४ चे सत्र ९ एप्रिलपासून सुरू होणार असून चेन्नईमध्ये पहिली लढत होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मध्ये होणार आहे. तर प्लेऑफचे सामने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. अहमदाबादेत हे सामने खेळवले जाणार असून  आयपीएलचा अंतिम सामना हा ३० मे रोजी अहमदाबादेत खेळवला जाईल.

यंदा आयपीएलचे सामने अर्धा तास आधी सुरू होतील. संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतील तर दुपारी सामन्यांची सुरुवात साडेतीन वाजता होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी