Rinku Singh Maruti Brezza Car: कोलकाता नाईट रायडर संघातून खेळताना रिंकू सिंगने सलग 5 चेंडूत 5 षटक ठोकत विजय मिळवून दिला, त्यासोबतच रिंकू टी -20 लीग किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 व्या षटकात सलग 5 षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक 29 धावा करत विजयाचा विक्रम केला आहे. ( Rinku Singh frst car maruti brezza price features and details )
यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने 20 व्या षटकात 23 धावा डेट चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. रिंकूने IPLमध्ये खेळायला सुरुवात 2008 पासून केली, तेव्हा त्याला कोलकाता संघाने 80 लाखात खरेदी केले होते. रिंकू हा खूप सामान्य कुटुंबातला मुलगा आहे.
अधिक वाचा : बीडमधील सावरकर गौरव यात्रेला प्रीतम आणि पंकजाची दांडी
रिंकू सिंगने 3 नोव्हेंबर 2018 ला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट रिपोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या पहिल्या IPL कमाईतून खरेदी केलेली कार पालकांना भेट दिली असल्याचे कळते. या पोस्टमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा ही लाल रंगाची कार दिसत आहे. ही ब्रेझा ची कोणती मॉडल आहे, हे मात्र कळू शकले नाही, इथे आम्ही तुम्हाला Suzuki Brezza बद्दल सांगणार आहोत.
ही एक 5 सिटर कार असून यात पाच प्रवासी बसू शकतात. मारुती ब्रेजाची किंमत 8.19 लाखपासून सुरू होऊन ते 14.04 लाख रुपयांपर्यंत आहे. मारुती ब्रेझा चे VXI, LXI, ZXI आणि ZXI Plus असे चार व्हेरियंट आहेत. या गाडीचा टॉप व्हेरियंट ZXI प्लस वगळला तर सर्वांमध्ये CNG किट देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे संकेत
ब्रेझा मध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सनरूफ, चार स्पीकर्स, पॅडल शिफ्टर्स (ऑटोमॅटिक व्हेरियंट), एम्बिएंट लाइट, वायरलेस फोन चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी यात 6 एअरबॅग देण्यात आले आहेत.
ब्रेझामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 101PS पॉवर आणि 136Nm टॉर्क जनरेट करू शकतो. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. या वाहनाच्या CNG वर्जनमध्येही हाच इंजिन पर्याय उपलब्ध आहे. तसेच या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.