Isha Negi:ऋषभ पंतची फलंदाजी पाहून आनंदाने नाचू लागली गर्लफ्रेंड Isha Negi,व्हिडिओ व्हायरल

IPL 2022
Updated May 09, 2022 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh Pant's Girlfriend Isha Negi: ऋषभ पंत (Rishabh Pant) ची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. स्टँड्समध्ये बसलेली इशा आनंदाने नाचत होती. 

rishabh pant
पंतची फलंदाजी पाहून आनंदाने नाचू लागली गर्लफ्रेंड Isha Negi 
थोडं पण कामाचं
  • इशा नेगी या सामन्याच्या आधीही ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतसोबत सामना पाहण्यासाठी पोहोचली होती
  • चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऋषभ पंतने ११ बॉलमध्ये २१ धावांची खेळी केली.
  • ऋषभ पंत आणि इशा नेगी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

मुंबई: २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतची(Rishabh Pant) गर्लफ्रेंड इशा नेगी(isha negi) प्रत्येक सामन्यात त्याला सपोर्ट करताना मैदानात दिसली आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कैपिटल्स (DC)यांच्यातील सामन्यातही इशा नेगी मैदानावर पोहोतली. या सामन्यात ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीने जबरदस्त शॉट लगावले. यावेळेस इशा नेगी आनंदाने नाचत असल्याची दिसली. तसेच जोरजोरात टाळ्या वाजवत होती. rishabh pant girlfriend isha negi excited during match

अधिक वाचा - शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती

पंतला सपोर्ट करण्यास पोहोचली इशा नेगी

इशा नेगी या सामन्याच्या आधीही ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतसोबत सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऋषभ पंतने ११ बॉलमध्ये २१ धावांची खेळी केली. या डावात त्याने १९०.९१च्या स्ट्राईक रेटने ४ चौकारही ठोकले. ऋषभ पंतचे हे शॉट्स पाहून स्टँड्समध्ये बसलील ऋषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी आनंदाने नाचताना दिसी. सोशल मीडियावर इशाची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. 

दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करतायत दोघे

ऋषभ पंत आणि इशा नेगी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ऋषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी पेशाने इंटीरियर डिझायनर आहे. इशा नेगी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. काही दिवांआधी जेव्हा इशा नेगीचा बर्थडे होता तेव्हा ऋषभने तिच्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. प्रत्युत्तरात इशा नेगीनेही ऋषभ पंतला आय लव्ह यू विश केले होते. इशा नेगीने शेअर केलेला फोटो चाहत्यांना खूप पसंत आला होता. 

अधिक वाचा - या दिवशी लागू शकतो दहावी आणि बारावीचा निकाल

आयपीएल २०२२मध्ये ऋषभ पंतची कामगिरी

आयपीएल २०२२मध्ये ऋषभ पंतने ११ सामन्यांत ३१.२२च्या सरासरीने २८१ धाा केल्या आहेत. या हंगामात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झालेले नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्लसने या हंगामात ११ सामने खेळले आहेत त्यापैकी ५ सामन्यांत त्यांना विजय मिळाला तर ६मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी