मुंबई: आयपीएलच्या १५व्या(ipl 2022) हंगामात फलंदाजीच्या क्रमात विविध स्थानांवर खेळणाऱ्या रॉवमेन पॉवेलने(rowmen powell) कर्णधार ऋषभ पंतला(rishabh pant) त्याने पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी विश्वास टाकण्यास सांगितले आणि त्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या(sunrisers hyderabad) सामन्यात त्याने हा विश्वास सार्थ करून दाखवत धमाकेदार खेळी केली. पॉवेलने गुरुवारी येथे ३५ बॉलमध्ये नाबाद ६७ धावा केल्या तर डेविड वॉर्नर(नाबाद ९२) सह शतकीय भागीदारी केली ज्यामुळे दिल्लीला हा सामना २१ धावांनी जिंकता आला. rishabh pant saves this player ipl career
अधिक वाचा - कंटेनरच्या धडकेत कॉलेज तरुणी ठार, कंटेनर चालकाला अटक
पॉवेल (Rovman Powell) ने सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सला सांगितले, मी त्याला म्हणजेच पंतला सांगितले की पाचव्या स्थानावर खेळण्यासाठी माझ्यावर विश्वास टाक. मला सुरुवात कऱण्याची संधी. पहिली १५-२० बॉल मला समजून घेऊ देऊ दे. मला अशा पद्धतीची फलंदाजी करायी आहे. पहिल्या २० बॉलमध्ये मी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेन.
या २८ वर्षीय ऑलराऊंडरने आयपीएलमध्ये सहाव्या नंबरवरील फलंदाज म्हणून सुरूवात केली होती. यानंतर तो दोन सामन्यात पाचव्या स्थानावर उतरला. मात्र त्यानंतर त्याला सहाव्या स्थानावर पाठवले. जेव्हा त्याला आठव्या स्थानावर पाठवण्यात आले तेव्हा तो खूप निराश होता. आयपीएलची सुरूवात माझ्यासाठी कठीण होती. मी ऋषभसोबत बातचीत केली. मी आठव्या स्थानावर उतरल्याने निरा होतो.
अधिक वाचा - पुतण्याने काकाच्या नावावर काढले १६ लाखांचे कर्ज
सनरायजर्स विरुद्ध पॉवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये लांब शॉट खेळले ज्यामुळे वॉर्नरला शतक पूर्ण करता आले नाही. पॉवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये वॉर्नरशी बातचीत केली. ओव्हरच्या सुरूवातीला पॉवेलने त्याला सांगितले तुला वाटतं का की मी एक धावा घेऊ ज्यामुळे तुला शतक पूर्ण करता येईल. त्यावर वॉर्नरने सांगितले, ऐक क्रिकेट असे खेळले जात नाही. तुला अधिकाधिक लांब शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.