मुंबई: केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२च्या १४व्या सामन्यात ५ विकेटनी पराभव सहन करावा लागला. हा सामना मुंबईने एकाच ओव्हरमध्ये आपल्या हाताने गमावला. मुंबईकडून या ओव्हरमध्ये डॅनिअल सॅम्सने ३५ धावा देत केकेआरच्या पदरात पराभव टाकला. मात्र त्यानंतरही कर्णधार या खेळाडूला दोषी मानत नाही. रोहितने पराभवाचे खापर दुसऱ्या खेळाडूंवर फोडले आहे.
अधिक वाचा - सोमय्या पित्रापुत्रांवर गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांकडून चौकशी
रोहित शर्माने या सामन्यानंतर मोठे विधान केले. रोहितने सामन्यानंतर म्हटले, फलंदाजीत आम्ही चांगली सुरूवात केली नाही. अखेरच्या ४-५ ओव्हरमध्ये ७०पेक्षा अधिक धावा करण्यासाठी फलंदाजांकडून चांगले प्रयत्न करण्यात आले. आम्ही योजनेनुसार गोलंदाजी केली नाही. आम्ही योजनेनुसार गोलंदाजी केली नाही. आमच्याकडे काही ओव्हर्सचा खेळ होता. मात्र तेव्हा कमिन्स शानदार होता. रोहितच्या मते फलंदाजीत मुंबई संघाने चांगली कामगिरी केली नाही. अशातच मुंबईकडे वाचवण्यासाठी जास्त धावा नव्हत्या.
रोहित म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे बोर्डवर धावा असतात तेव्हा आमच्याकडे नेहमी हात वरचढ असतो. आम्ही त्यांचे ५ विकेट घेतले होते. हे केवळ वेंकी आणि पॅटच्या विकेटची बात होती. तयांच्याकडे सुनील होता जो त्यांना स्मॅश करू शकत होता. रोहितने कमिन्सचे कौतुक करताना म्हटले, मी त्याच्याकडून अशा खेळीची अपेक्षा कधीच केली नव्हती. तो ज्या पद्धतीने खेळला त्याचे श्रेय त्याला जाते. फलंदाजीत आमची सुरूवात चांगली नव्हती. आम्ही १५व्या ओव्हरपर्यंत सामन्यात होतो मात्र कमिन्सने सर्व समीकरणे बिघडवली.
अधिक वाचा - पाच महिन्यानंतर पुन्हा धावणार एसटी
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले, ते आपल्या ऱणनीतीवर कायम होते मात्र ते त्यानुसार पुढे सरतील त्याआधी कमिन्सने विजय मिळवला. केकेआरने १६२ धावांचे लक्ष्य केवळ १६ ओव्हरमध्ये पूर्ण केले. अय्यरने सांगितले, मी केवळ बॉलला हवेत उडताना पाहत होतो. मला विश्वास होत नव्हता. त्याची ही जबरदस्त खेळी होती.
मॅन ऑफ द मॅच कमिन्सने सामन्यानंतर सांगितले, मी या खेळीने अधिक हैराण आहे. या धावा झाल्या. मी अधिक विचार करत होता. ते समाधानकारक आहे. असे वाटत होते की बॉल हवेत तरंगत होता.