IPL 2019: आयपीएल २०१९ जिंकल्यानंतर रोहित-युवराजचा व्हिडिओ व्हायरल 

IPL 2019
Updated May 13, 2019 | 23:52 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

MI vs CSK: रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकली. मुंबईनं रविवारी आयपीएल २०१९ फायनलमध्ये चेन्नईला १ रननं मात केली. त्यानंतर मुंबईच्या टीमनं विजयाचा जोरदार आनंद साजरा केला.

Mumbai Indians win
आयपीएल २०१९ जिंकल्यानंतर रोहित युवराजचा व्हिडिओ व्हायरल 

हैदराबादः मुंबई इंडियन्सनं रविवारी हैदराबादमध्ये चेन्नई सुपरकिंग्सला आयपीएल २०१९ च्या फायनलमध्ये एका रननं पराभूत करत इतिहास रचला. त्यासोबतच मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात सर्वांत जास्त किताब जिंकणारी टीम बनली आहे. मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला आणि चेन्नई सुपरकिंग्स (तीन वेळा) ला पराभूत केलं. मुंबईनं आयपीएल २०१९ मध्ये हळु सुरूवात केली. मात्र त्यानंतर या लीगच्या शेवटी मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये टॉपवर होती. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं पहिल्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नईला मात दिली आणि थेट फायनलमध्ये एन्ट्री केली. मुंबईनं चेन्नईवर आपला दबादबा कायम ठेवत आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्सला एकाच सिझनमध्ये चार वेळा पराभूत केलं. 

आयपीएल १२ व्या फायनलमध्ये मुंबईनं पहिल्या बॅटिंग करत ठराविक २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावत १४९ रन्स केले. त्यांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची टीम २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावत १४८ रन करू शकली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं रोमांचक फायनलमध्ये विजय  मिळवत आपला आनंद साजरा केला. हैदराबादच्या मैदानावरच रोहित शर्मा सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसला. 

मुंबई इंडियन्सनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मुंबई इंडियन्सची टीम आपल्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन करत आहे. या व्हिडिओत कॅप्टन रोहित शर्मा आणि युवराज सिंगनं दिसत आहे. दोघं ही गली बॉय सिनेमातील गाण्यावर रॅपिंग करताना दिसत आहेत. गाण्याचे बोल रोहित बोलताना दिसतोय. तर युवराज यात रोहितची साथ देत आहे. 

बघा व्हिडिओ

 

 

युवराज सिंहचा १२ वर्षांतला हा पहिला आयपीएल किताब आहे. याआधी युवराज बऱ्याच फ्रेंचाइजीसाठी खेळला आहे. मात्र आतापर्यंत त्याच्या आयपीएलच्या करिअरमध्ये किताब मिळाला नव्हता. मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात वेगवान बॉलर लसिथ मलिंगा याचा महत्त्वाचा वाटा आहे. मलिंगानं शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरला आऊट करून मुंबईला विजयाच्या वाटेवर नेलं. 

मलिंगा फायनलमध्ये जीरोपासून हिरो ठरला. कारण त्यानं पहिल्या तीन ओव्हरमध्ये ४२ रन दिले. तर शेवटच्या ओव्हरमध्ये ९ रनची यशस्वीरित्या संरक्षण केलं. रोहितनं विजयानंतर समायराला कुशीत घेतलं आणि विजयाचा सेलिब्रेशन केलं. विजयानंतर रोहितनं सांगितलं की, मुलगी समायरासमोर आयपीएलचा किताब जिंकणं विशेष ठरलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: आयपीएल २०१९ जिंकल्यानंतर रोहित-युवराजचा व्हिडिओ व्हायरल  Description: MI vs CSK: रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकली. मुंबईनं रविवारी आयपीएल २०१९ फायनलमध्ये चेन्नईला १ रननं मात केली. त्यानंतर मुंबईच्या टीमनं विजयाचा जोरदार आनंद साजरा केला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola