आरसीबी ६ धावांनी विजयी

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 14, 2021 | 23:45 IST

Royal Challengers Bangalore beat Sunrisers Hyderabad by 6 runs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची मॅच सहा धावांनी जिंकली.

Royal Challengers Bangalore beat Sunrisers Hyderabad by 6 runs
आरसीबी ६ धावांनी विजयी 

थोडं पण कामाचं

  • आरसीबी ६ धावांनी विजयी
  • सनरायझर्स हैदराबादचा पराभव
  • आरसीबीच्या शाहबाझ खानची कमाल; २ ओव्हरमध्ये ७ धावा देत ३ विकेट आणि १० चेंडूत १४ धावा असे दुहेरी योगदान

चेन्नई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची मॅच सहा धावांनी जिंकली. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही आयपीएलची लीग मॅच झाली. Royal Challengers Bangalore beat Sunrisers Hyderabad by 6 runs

टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय घेतला. ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक (४१ चेंडूत ५९ धावा) आणि सलामीला आलेल्या विराट कोहलीच्या २९ चेंडूत ३३ धावा यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादसमोर २० ओव्हरमध्ये १५० धावा करण्याचे आव्हान ठेवले. हे माफक आव्हान सनरायझर्स हैदराबादला पेलवले नाही. त्यांना २० ओव्हरमध्ये ९ बाद १४३ धावा एवढीच मजल मारता आली. 

सनरायझर्स हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक (३७ चेंडूत ५४ धावा) झळकावले तर मनिष पांड्येने ३९ चेंडूत ३८ धावांचे मोलाचे योगदान दिले. राशिद खानने ९ चेंडूत १७ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने १३ चेंडूत १२ धावा केल्या. आरसीबीकडून शाहबाझ खानने दोन ओव्हरमध्ये सात धावा देत तीन विकेट घेण्याची कमाल केली. मोहम्मद सिराज आणि हर्षद पटेल या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. केली जेमिनसनने एक विकेट घेतली. 

याआधी प्रथम फलंदाजी करताना मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५९ आणि विराट कोहलीने २९ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. शाहबाझ अहमदने दहा चेंडूत १४ धावा केल्या तर केली जेमिनसनने १२ धावा केल्या. देवदत्त पडिक्कल ११ धावा करुन परतला. सनरायझर्स हैदराबादच्या जेसन होल्डरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. राशिद खानने दोघांना बाद केले. भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर आणि टी. नटाजन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी