IPL 2019: आरसीबीचा सलग दुसरा विजय, १ धावानं सीएसकेचा पराभव

IPL 2019
Updated Apr 22, 2019 | 08:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Match Update Indian Premier League 2019: रविवारी सीएसके आणि आरसीबीमध्ये झालेल्या रोमाचंक सामन्यात आरसीबीनं शेवटच्या बॉलमध्ये सामना आपल्या खिशात टाकला. आरसीबीनं पहिल्या पराभवचा हिशोब चुकता केला आहे.

CSK vs RCB
IPL 2019: आरसीबीचा सलग दुसरा विजय, १ धावानं सीएसकेचा पराभव 

RCB vs CSK Indian Premier League 2019 Yesterday match: रविवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात रोमाचंक सामना झाला. रॉयल चॅलेजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपरकिंग्सला केवळ १ रननं पराभूत केलं. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६१ धावांची खेळी केली. त्यावर चेन्नईच्या टीमनं २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १६० धाव संख्या बनवली. एमएस धोनीनं ४८ बॉलमध्ये ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं नाबाद ८४ रन बनवले. 

चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये २६ धावांची गरज होती. धोनीनं उमेश यादवच्या या ओव्हरमध्ये ५ बॉलमध्ये २४ रन केले. मात्र शेवटच्या बॉलमध्ये शार्दुल ठाकुरला पार्थिव पटेलनं रनआऊट करून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

अशी झाली सामन्यातली शेवटची ओव्हर 

  1. चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये २६ धावांची गरज होती. मैदानावर एमएस धोनी उपस्थित होता. विराट कोहलीनं उमेश यादवला शेवटची ओव्हर टाकण्यास सांगितलं. 
  2. धोनीनं पहिल्याच बॉलमध्ये शॉर्ट घेत डीप स्क्वायर लेगच्या दिशेनं बॉल मारला आणि बाऊंड्रीच्या दिशेनं बॉल गेला. आता चेन्नईला ५ बॉलमध्ये २२ धावांची गरज होती. 
  3. त्यानंतरचा बॉल उमेश यादवनं शॉर्ट लेंथवर टाकला. त्यावर एमएस धोनीनं स्टेडिअमच्या पार षटकार ठोकला. 
  4. आता चेन्नईला ४ बॉलमध्ये १६ धावांची गरज होती. उमेश यादवनं ऑफ स्टंपवर फुल लेंथवर बॉल टाकला. त्यावर धोनीनं लॉग ऑफ वर हवेत बॉल मारला. बाऊंड्रीवर एबी डिव्हिलिअर्स उपस्थित होता. त्यानं हवेत उडी मारत शॉट रोकण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. हा देखील षटकार ठरला. 
  5. आता चेन्नईला ३ बॉलमध्ये १० धावांची गरज होती. उमेशनं यॉर्क बॉल टाकला. धोनीनं डीप मिडविकेटच्या दिशेनं शॉट मारला आणि दोन रन मिळवले. आता चेन्नईला २ बॉलमध्ये ८ धावांची गरज होती. 
  6. ओव्हरच्या पाचव्या बॉलमध्ये उमेशनं फुलटॉस टाकला. धोनीनं त्यावर चांगला षटकार मारला. आता चेन्नईला विजयासाठी २ धावांची गरज होती. 
  7. धोनी क्रिजवर होता. उमेशच्या चेहऱ्यावर दडपण होतं. विराट कोहलीचा चेहरा उतरला होता. उमेशनं हळू वेगानं बॉल टाकला. धोनी बीट झाला आणि एक रनसाठी धावला. पार्थिव पटेलनं विकेटच्या मागून सरळ थ्रो केला आणि शार्दुल ठाकूरला रनआऊट केलं आणि धोनीच्या खेळी अयशस्वी ठरली. कोहलीच्या टीमनं धोनीच्या टीमला केवळ १ रननं पराभूत केलं. 

या सामन्यानंतर आरसीबीचा चेन्नईसोबतच्या सलग झालेल्या सातव्या पराभवाचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. आरसीबीनं धोनीच्या टीमला लागोपाठ झालेल्या सातव्या पराभवानंतर मात दिली आहे.

आतापर्यंतचा दोन्ही टीममधला संघर्ष 

दोन्ही संघामध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले. ज्यात ७ वेळा बंगळुरू आणि १५ वेळा चेन्नई विजयी झाली आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. मात्र आरसीबीसाठी ही गोष्ट खूप निराशाजनक आहे की, दोघांमध्ये खेळण्यात आलेल्या गेल्या सात सामन्यात टीम एकही सामना जिंकू शकली नाही. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये दोन्ही टीममघ्ये ८ सामने खेळवण्यात आले. ज्यात आरसीबीनं ३  आणि चेन्नईनं ४ सामन्यावर विजयाचा झेंडा रोवला. तर एका सामन्याचा काही निकाल लागला नाही. या सिझनमध्ये दोन्ही टीममध्ये झालेला पहिला सामन्यात चेन्नईनं हरभजन आणि इमरान ताहिरच्या शानदार बॉलिंगमुळे आरसीबीला ७० रनवरच गार केलं होतं. त्यानंतर विजयासाठी असलेलं लक्ष्य ७ विकेट आणि १४ बॉल बाकी असताना प्राप्त केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: आरसीबीचा सलग दुसरा विजय, १ धावानं सीएसकेचा पराभव Description: Match Update Indian Premier League 2019: रविवारी सीएसके आणि आरसीबीमध्ये झालेल्या रोमाचंक सामन्यात आरसीबीनं शेवटच्या बॉलमध्ये सामना आपल्या खिशात टाकला. आरसीबीनं पहिल्या पराभवचा हिशोब चुकता केला आहे.
Loading...
Loading...
Loading...