RCB vs PBKS, IPL 2021, Match-26: बंगळुरूसमोर असणार पंजाबची अग्निपरीक्षा, जाणून घ्या दोन्ही संघाची रणनीती 

IPL 2021
Updated Apr 30, 2021 | 15:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Royal Challengers Bangalore vs Punjab Kings: पंजाब किंग्समोर बंगळुरूचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात चांगले प्रदर्शन करणे महत्त्वाचे असणार आहे. 

rcb vs pbks
बंगळुरूसमोर असणार पंजाबची अग्निपरीक्षा 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२१मधील२६वा सामना - आरसीबी वि पंजाब
  • आरसीबीचा संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे.
  • पंजाबला गेल्या सामन्यात केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता

अहमदाबाद:  सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे बॅकफूटवर पोहोचलेल्या पंजाब किंग्ससमोर(punjab kings) आज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे(royal challengers bangalore) आव्हान असणार आहे. पंजाबला विजयी पथावर परतायचे असेल तर त्यांना या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कोलकाता नाईट रायडर्सकडून पाच विकेटनी पराभव स्वीकारणाऱ्या पंजाबसमोर आरसीबीचे आव्हान झेलणे सोपे असणार नाही. त्यांना प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल.(royal challengers bangalore vs punjab kings match today in ipl 2021)

पंजाबचा संघ चार पराभव आणि दोन विजयांसह अंकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर आरसीबीने पाच सामन्यांत विजय मिळवला असून ते गुणतालिकेत कमी रनरेटमुळे चेन्नईनंतर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीएसकेकडून त्यांना केवळ पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, यंदाच्या हंगामात आरसीबी दमदार दावेदार दिसत आहेत. स्पर्धा पुढे वाढत आहे तसेच त्यांचे खेळाडू फॉर्ममध्ये येत असल्याचे दिसत आहे. 

पंजाबला फलंदाजीमध्ये सुधारणेची गरज

पंजाबला आतापर्यंत त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे नुकसान पोहोचले आहे. आपल्या सहा सामन्यात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने तीन सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १०६, १२० आणि १२३ इतका कमी स्कोर केला. राहुलने आतापर्यंत आपल्या संघाकडून फलंदाजीची धुरा सांभाळली. आजच्या सामन्यात त्यांना आरसीबीविरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. क्रिस गेलला अद्याप हवा तसा सूर गवसलेला नाही. निकोलस पूरन धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याने पाच सामन्यांत केवळ २८ धावा केल्या आहेत. तीन डावांत तर त्याला खातेही खोलता आलेले नाही. जेव्हा मोठा स्कोर नसतो तेव्हा पंजाबचे गोलंदाजही काही करू शकते. दरम्यान, त्यांच्या गोलंदाजीतही आक्रमकतेचा अभाव दिसतो.  

आरसीबीकडे आत्मविश्वास भारी

यंदाच्या हंगामात बंगळुरूचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. सुरूवातीपासूनच त्यांची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळेच सर्वच खेळाडू आत्मविश्वासाने खेळत आहे. विराटच्या नेतृत्वाखालील या संघाला केवळ चेन्नईकडून पराभव पाहावा लागला. तर पाच सामन्यांत विजय मिळवण्यात त्यांना यश मिळाले. 

संघ

पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, मनदीप सिंह, प्रबसिमरन सिंह, निकोलस पूरण, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बराड़, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, दर्शन नालकंडे, क्रिस जॉर्डन, डाविड मलान, झॉय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोइसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फैबियन एलन, सौरभ कुमार.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), एबी डीविलियर्स, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एमएस वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, डेनियल सैम्स, हर्षल पटेल, ग्लेन मैक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जॅमीसन, डॅन क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन एलन.

सामन्याची वेळ - संध्याकाळी साडेसात वाजता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी