'दु:खातही हसायला कॅप्टन कूलने शिकवलं', धडकेबाज खेळीनंतर ऋतुराज गायकवाडाने व्यक्त केल्या भावना

IPL 2020
Updated Oct 30, 2020 | 15:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

चेन्नईच्या सलग दुसऱ्या विजयात हीरो बनलेल्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने सांगितले आहे की कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुरुवातीच्या अपयशाच्या काळात त्याला काय धडे दिले आणि काय शिकवले.

Ruturaj Gaikwad
कलकत्त्याविरोधात तूफान खेळी केल्यानंतर म्हणाला ऋतुराज गायकवाड- कॅप्टन कूलने शिकवले दुःखातही हसणे  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • २३ वर्षीय ऋतुराज गायकवाडने गुरुवारी कलकत्त्याविरोधात केली विजयी खेळी
  • सलग दुसऱ्या सामन्यात सुरुवात करत ठोकले अर्धशतक आणि झाला सामनावीर
  • आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात कोरोनातून बाहेर येण्यासाठी ऋतुराजला लागला होता बराच वेळ

दुबई: आयपीएल २०२०च्या (IPL 2020) प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर (exit from play-off) चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) मालिकेच्या शेवटच्या काळात पुन्हा फॉर्ममध्ये (back in form) आली आहे. धोनीसेनेच्या (Dhoni’s team) चांगल्या खेळाचे श्रेय या युवा खेळाडूला जाते ज्याने उत्तम खेळ करत संघाला सन्माननीय जागेवर नेले आहे. गुरुवारी धोनीच्या धुरंधरांनी कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) रोमांचक सामन्यात ६ गड्यांनी मात दिली. धावसंख्येचा (chasing the target) पाठलाग करताना सीएसकेने केकेआरला धूळ चारली. युवा फलंदाज (young batsman) ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ५३ चेंडूंत ७२ धावा काढत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला आणि शेवटच्या षटकात सर जडेजाने (Ravindra Jadeja) धमाकेदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

ऋतुराजने केली धोनीची भरभरून स्तुती

विजयासाठी १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला विजय मिळवून दिल्यानंतर युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भरभरून स्तुती केली आणि त्याच्या शांत आणि लाजाळू स्वभावाला संघाच्या व्यवस्थापनातील अडचण म्हटले. पण सलग दुसऱ्या सामन्यात विजयी खेळीनंतर ऋतुराजने सांगितले की कोरोनाने कसा त्याच्यावर परिणाम केला आणि कप्तान एमएस धोनीने त्याला काय शिकवण दिली.

सर्व ठीक होईल असा होता विश्वास

ऋतुराजने सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा किताब मिळवल्यानंतर म्हटले, ‘मला खूप छान आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटत आहे. माझ्या दोन खेळ्या संघाच्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या याचा मला आनंद आहे. ’ आयपीएलमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यात दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर तुला काय वाटले असे विचारले असता त्याने सांगितले, ‘तेव्हाही माझ्यात आत्मविश्वास होता आणि मी स्वतःचा बचाव करत होतो, कारण दोन्हीवेळा जेव्हा मी बाद झालो तेव्हा फलंदाजीची अवस्था अवघड होती आणि मला जोखीम उचलायची होती. पण मला विश्वास वाटत होता की जर पुढे मला काही चेंडूंचा सामना करण्याची आणि सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर सर्व काही ठीक होईल आणि मी चांगले प्रदर्शन करेन असा विश्वास होता.’

कोरोनाने केले मजबूत

२३ वर्षीय ऋतुराज गायकवाड हा अशा खेळाडूंपैकी आहे जो आयपीएलच्या सुरुवातीला कोरोनाने संक्रमित झाले होते आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याला जवळपास वीस दिवस लागले होते. त्यामुळे मालिकेच्या सुरुवातीला त्याला संधीही मिळाली नव्हती. याबद्दल ऋतुराज म्हणाला, की कोरोनाने त्याला मजबूत केले. आमचा कर्णधार नेहमी म्हणतो की प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत करावा. मी हाच प्रयत्न करत आहे. हे कठीण आहे, पण माझे प्रयत्न चालू आहेत. कोरोनाने मला वर्तमानात राहण्याची शिकवण दिली आहे. भूतकाळात न राहण्याचा आणि भविष्याचाही फारसा विचार न करण्याचा धडा या कठीण काळाने मला दिला आहे.

दुबळा-बारीक दिसणारा ऋतुराज मैदानात लांब-लांब षट्कार मारतो. जेव्हा त्याला विचारले गेले की इतकी ताकद तो कुठून आणतो तेव्हा त्याने मजेत सांगितले की तो खूप मेहनत करतो आणि त्याचे सिक्स पॅक अॅब्जही आहेत.

ऋतुराजने गेल्या सामन्यात आरसीबीच्या विरोधात धावांचा पाठलाग करताना ६५ धावांची नाबाद खेळी केली होती. पण त्याआधीच्या तीन सामन्यांमध्ये तो ०, ५ आणि ० धावांवर बाद झाला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी