मुंबई: नेदरलँडचे कोच रेयान कँपबेल(Ryan Campbell) यांना हृदयरोगाचा झटका(heart attack) आल्यानंतर एक आठवड्यापासून त्यांची स्थिती गंभीरर आहे. त्यांच्यावर ब्रिटनमध्ये उपचार सुरू आहेत. इ'ईएसपीएनक्रिकइंफो'च्या माहितीनुसार कँपबेल यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी विधान करत त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे माजी विकेटकीपर फलंदाज रेयान यांना गेल्या शनिवीर हृदयरोगाचा झटका आला होता.. Ryan Campbell health is in critical condition
अधिक वाचा - मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी हे 3 आयुर्वेदिक औषधे आहेत उपयोगी
कुटुंबाने दिलेल्या विधानानुसार रेयान यांना गेल्या आठवड्यात हृदयरोगाचा झटका आला. त्यांच्यावर ब्रिटनच्या रॉयल स्टोक युनिर्व्हसिटीमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या तब्येतीत अद्याप सुधारणा नाही. डॉक्टर यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. ते बराच काळ शुद्धीत नाही आहे आणि या आठवड्याच्या शेवटपर्यंत ही स्थिती कायम राहण्याी शक्यता आहे. आम्ही हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो.
शनिवारी हृदयरोगाचा झटका आल्यानंतर ५० वर्षीय कँपबेलला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.. ब्रिटनमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या कँपबेल यांना छातीमध्ये दुखायला तसेच श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. कँपबेल नेदरलँडच्या टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यावर युरोपात परतले होते. त्यांना जानेवारी २०१७मध्ये नेदरलँडच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले होते.
अधिक वाचा - दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या परिसरात गोळीबार
एक खेळाडू म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग दोन्हीचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१६मध्ये हाँगकाँगचे प्रतिनिधित्व केले होते. सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून त्यांनी टी-२० प्रकारात पदार्पण केले होते.