IPL 2022: अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्समध्ये संधी न मिळाल्यावर सचिनने केले हे विधान

IPL 2022
Updated May 25, 2022 | 13:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल २०२१मध्ये २० लाख आणि २०२२च्या हंगामात ३० लाख रूपये देऊन मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. दोन्ही हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. 

arjun tendulkar
अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी न मिळाल्याने सचिन म्हणाला. 
थोडं पण कामाचं
  • अर्जुन तेंडुलकरला या हंगामात आणि मागील हंगामात खेळायला मिळाले नाही. 
  • मुंबई इंडियन्सचा संघ लीग स्टेजमध्ये १०व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर राहिला. 
  • सचिन तेंडुलकर म्हणाला, संघ निवड मी नेहमीच मॅनेजमेंटवर सोपवत असतो. 

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा(sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला(arjun tendulkar) इंडियन प्रीमियर लीगच्या दोन हंगामात( (IPL 2021 आणि 2022) मध्ये मुंबई इंडियन्सच्या २८ सामन्यांमध्ये एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. याबाबत सचिनने सांगितले की त्याचे सिलेक्शनशी कोणतेही घेणे-देणे नाही. मात्र तो नेहमी अर्जुनला समजावतो की त्याचा हा मार्ग सोपा नाही तर खूप कठीण आणि आव्हानात्मक आहे. २२ वर्षीय अर्जुनने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत मुंबईकडून केवळ २ टी-२० सामने खेळले आहेत. sachin statement for not selecting in mumbai indians team for atleast 1 match

अधिक वाचा - मारा दांडी किंवा घ्या सुट्टी पण जरूर फिरा ही १० पर्यटन स्थळे

मुंबई इंडियन्समध्ये मेंटॉरची भूमिका साकारणाऱ्या सचिन तेंडुलकरने हे ही स्पष्ट केले की तो निवड बाबतीत हस्तक्षेप करत नाही. विशेष म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज अर्जुनला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले होते. २०२१मध्ये त्याला २० लाखांच्या बेस प्राईजवर फ्रेंचायझीने विकत घेतले होते. त्यानंतर २०२२मध्ये त्याला ३० लाख रूपयांना खरेदी करण्यात आले होते. मात्र लीगच्या दोनही हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 

अर्जुनला संधी न मिळाल्याबद्दल काय म्हणाला सचिन?

एका शोमध्ये जेव्हा सचिनला विचारण्यात आले की त्याला या वर्षी अर्जुनला खेळताना पाहायला आवडले असते का, यावर उत्तर देताना सचिन म्हणाला, हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो अथवा मला काय जाणवतेय हे महत्त्वाचे नाही आहे. मुंबई इंडियन्ससाठी हंगाम संपला आहे आणि मी अर्जुनला नेहमी हेच सांगतो की रस्ता खूप आव्हानात्मक आणि कठीण आहे. 

अधिक वाचा - 800 वर्ष जुन्या इतिहासावर कोर्टात चर्चा, जाणून घ्या प्रकरण

२०० कसोटी सामने खेळणाऱ्या एकमेव क्रिकेटर सचिन तेंडुलकरने पुढे सांगितले, तु क्रिकेट खेळणे सुरु केले कारण तुझे क्रिकेटवर प्रेम आहे. असे करणे सुरूच ठेव. कठोर मेहनत करत राहा आणि परिणाम नक्की मिळतील. जोपर्यंत निवडीचा प्रश्न आहे तर मी ही बाब मॅनेजमेंटवर सोडतो. जर आपण निवडीबाबत बोलत आहोत तर मी कधीच निवडमीमध्ये सामील केले नसते. या सर्व गोष्टी मी टीम मॅनेजमेंटवर सोडतो कारण मी नेहमी असेच केले आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी