IPL 2022: पुण्याला जाताना रस्त्यात भेटले ट्रॅफिक; टाईमपाससाठी सचिनने धरला मराठी गाण्यावर ठेका 

IPL 2022
Updated Apr 06, 2022 | 16:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sachin Tendulkar Video | आयपीएलच्या १५ व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्हीही संघ यासाठी पुण्याला पोहचले आहेत. संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकर आणि किरण मोरे हे देखील या सामन्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. यादरम्यान रस्त्यात सचिन आणि किरण यांना मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला.

Sachin Tendulkar dances to Marathi song for time pass in traffic
ट्रॅफिकमध्ये टाईमपाससाठी सचिनने धरला मराठी गाण्यावर ठेका   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएलच्या १५ व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत.
  • हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
  • दोन्हीही संघ यासाठी पुण्याला पोहचले आहेत.

Sachin Tendulkar Video | मुंबई : आयपीएलच्या १५ व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्हीही संघ यासाठी पुण्याला पोहचले आहेत. संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकर आणि किरण मोरे हे देखील या सामन्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. यादरम्यान रस्त्यात सचिन आणि किरण यांना मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. मात्र या ट्रॅफिकमध्ये टाईमपास होण्यासाठी त्यांनी चांगलाच मार्ग काढला आहे. (Sachin Tendulkar dances to Marathi song for time pass in traffic). 

दरम्यान, सचिन आणि किरण मोरे मंगळवारी मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. रस्त्यात ट्रॅफिकमुळे त्यांची गाडी हळू-हळू चालायला लागली त्यामुळे या दोघांनीही टाईमपाससाठी मराठी गाणं लावले आणि त्याचा आनंद घेऊ लागले. हळू-हळू हे दोन्हीही माजी दिग्गज खेळाडू या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळाले. 

सचिने तेंडुलकरने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले की, "पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो तर विचार केला की चला या सुंदर गाण्याचा आनंद घेऊया." तसेच त्याने या गाण्याच्या ओळीदेखील ट्विट केल्या आहेत. 

मुंबई इंडियन्सची खराब सुरूवात 

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरूवात निराशाजनक झाली आहे. संघाला आपल्या सुरूवातीच्या दोन्हीही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीविरूध्द पराभूत झाली. तर दुसऱ्या सामन्यात राजस्था रॉयल्सने मुंबईच्या संघाला २३ धावांनी पराभूत केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी