IPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद 

IPL 2019
Updated May 15, 2019 | 12:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019 Final match MI vs CSK: सचिन तेंडुलकरनं आयपीएलच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या जसप्रीत बुमराहला जगातला सर्वश्रेष्ठ बॉलर असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहची शानदार रिअॅक्शन समोर आली आहे. 

jasprit bumrah
IPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद   |  फोटो सौजन्य: AP

IPL 2019 jasprit bumrah: जसप्रीत बुमराहचं  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केल्यानंतर क्लीन बोल्ड झाला आहे. मुंबई इंडियन्सचा फास्टर बॉलरनं आयपीएल २०१९ च्या फायनलला चेन्नई सुपरकिंग्सविरूद्ध चांगली बॉलिंग केली. त्यासाठी जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित देखील करण्यात आलं. बुमराहनं १५० धावांचं संरक्षण करण्यात खूप मोठी भूमिका बजावली. त्याच्या या मदतीनं मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. 

उजव्या हाताचा फास्टर बॉलरनं आयपीएल २०१९ फायनलमध्ये १४ धावा दिल्या. अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो यांसारख्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सनं किताब जिंकल्यानंतर आयकॉन सचिन तेंडुलकर यांनी बुमराहचं खूप कौतुक केलं. सचिन तेंडुलकर यांनी बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ वेगवाग बॉलर असल्याचं म्हटलं. पुढे सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं की, अजूनही त्याचा सर्वोत्तम सामना होणं बाकी आहे. 

तेंडुलकर यांनी म्हटलं की, ऑन रेकॉर्ड मला बोलायचं आहे की जसप्रीत बुमराह यावेळचं जगातील सर्वश्रेष्ठ बॉलर आहे आणि अजूनही त्याचा सर्वोत्तम सामा होणं बाकी आहे. तेंडुलकर यांच्या या कौतुकानंतर जसप्रीत बुमराहची बोलती बंद झाली. 

या कौतुकानंतर बुमराहनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे आभार मानले आहेत. बुमराहनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे. धन्यवाद सचिन सर. 

बुमरहानं आयपीएल २०१९ मध्ये १६ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या. फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर बुमराहनं आपल्या यशाचं गुपीत उघडले. त्यावेळी बुमराह बोलला की, मी कठीण परिस्थितीत घाबरत नाही.  फाइनलमध्ये आम्हाला माहित होता की सामना जवळपासच असेल आणि मुंबई इंडियन्ससाठी ही स्पर्धा जिंकणे विशेष राहिल. मला आश्चर्य वाटले की मी खूप शांत होतो. मला जराही भीती वाटली नाही आणि टीमसाठी योगदान दिल्यानं मला खूप आनंद वाटतोय. मी खेळताना एका वेळेस बॉलवर लक्ष ठेवलं आणि जर का तुम्ही याचा विचार केलात तर त्याचा दबाव जराही नसतो. 

रविवारी झालेल्या आयपीएल २०१९चा फायनल सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा होता. यावेळी मुंबई इंडियन्स केवळ १ रननं चेन्नई सुपरकिंग्सला पराभूत करून विजयाचा किताब आपल्या नावावर केला. ५१ दिवस चाललेल्या आयपीएलच्या या सीझनमध्ये देश- विदेशातील सगळ्याचे खेळाडूंनी आपला जलवा दाखवला. अशातच आयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलनंतर ६० सामन्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शानदार प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात आलं.

आयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलच्या सामन्यात फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहची महत्त्वाची बॉलिंग पराभव- विजयाच्या अंतरात सिद्ध झाली. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन दोन विकेट्स मिळवल्या. यावेळी १३ बॉलमध्ये कोणताही रन घेतला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी