संजय मांजरेकरच्या मनातली आयपीएल टीम

sanjay manjrekar ipl dream 11 team वरिष्ठ क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांची आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम

 ipl 2020, cricket, sanjay manjrekar ipl dream 11 team
संजय मांजरेकर 

थोडं पण कामाचं

  • संजय मांजरेकरच्या मनातली आयपीएल टीम
  • संजय मांजरेकर कॉमेंट्री करणार
  • भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संजय मांजरेकर टीव्ही कॉमेंट्रेटरच्या टीममध्ये

मुंबईः आयपीएल अंतिम टप्प्यात आहे. क्वालिफायर टू आणि फायनल अशा दोन मॅच उरल्या आहेत. या टप्प्यावर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंमधून एक ड्रीम टीम तयार करण्यात आली. वरिष्ठ क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी ही टीम तयार केली. मांजरेकरांच्या मनातल्या आयपीएल इलेव्हन टीममध्ये ११ क्रिकेटपटू आहेत. यात चार विदेशी खेळाडू आणि सात भारतीय आहेत. (sanjay manjrekar ipl dream 11 team)

अनेक स्टार खेळाडूंना मांजरेकरांच्या टीममध्ये स्थान मिळालेले नाही. भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही टीमचा कॅप्टन असलेल्या विराट कोहलीला मांजरेकरांच्या मनातल्या आयपीएल इलेव्हन टीममध्ये स्थान मिळाले नाही. फायनलमध्ये दिमाखात दाखल झालेल्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा यालाही मांजरेकरांच्या टीममध्ये स्थान मिळालेले नाही. पर्पल कॅप विजेत्या कगिसो रबाडाचाही मांजरेकरांच्या टीममध्ये समावेश झालेला नाही.

यंदाच्या आयपीएलमधील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कामगिरी तसेच वय या सर्व मुद्यांचा गंभीरपणे विचार करुन संजय मांजरेकर यांनी त्यांच्या मनातली आयपीएल इलेव्हन टीम तयार केली. ही मांजरेकरांची ड्रीम इलेव्हन टीम आहे. या टीममध्ये मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान मिळाले आहे. तो मांजरेकरांच्या मनातल्या टीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज आहे. सलामीची जोडी फुटल्यावर मैदानात येऊन धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी या फलंदाजावर असते. अशा जबाबदारीसाठी सूर्यकुमार सक्षम असल्याचे मत मांजरेकरांनी त्याची निवड करुन अप्रत्यक्षपणे व्यक्त केले. 

अक्षर पटेलला अष्टपैलू खेळाडू म्हणून मध्य क्रमात मांजरेकरांनी स्थान दिले. टीममध्ये मांजरेकरांनी मध्य क्रमात एबी डीविलिअर्स, निकोलस पूरन आणि अक्षर पटेल यांचा समावेश केला आहे. युजवेंद्र चहल आणि राशिद खान यांना उत्तम फिरकीपटू म्हणून तर मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह, जोफ्रा आर्चर यांना आक्रमक वेगवान गोलंदाज म्हणून मांजेरकांनी त्यांच्या टीममध्ये सहभागी केले.

संजय मांजरेकर यांची आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम - केएल राहुल, मयांक अगरवाल, सूर्यकुमार यादव, एबी डीविलिअर्स, निकोलस पूरन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, राशिद खान, मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह, जोफ्रा आर्चर

संजय मांजरेकर कॉमेंट्री करणार

रविंद्र जाडेजा हा निवडक मॅचमध्ये कामगिरी करतो तर निवडक मॅचमध्ये कामगिरी करत नाही अशा स्वरुपाची टिप्पणी केल्यामुळे संजय मांजरेकर यांना मागच्या वर्षीच्या वर्ल्ड कप नंतर प्रदीर्घ काळ समालोचनाची (कॉमेंट्री) संधी मिळाली नव्हती. अखेर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने संजय मांजरेकर यांना पुन्हा समालोचनाची (कॉमेंट्री) संधी मिळाली आहे. संजय मांजरेकर आता ५५ वर्षांचे आहेत, त्यांनी अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांचा समालोचकांच्या टीममध्ये समावेश झाला. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संजय मांजरेकर टीव्ही कॉमेंट्रेटरच्या टीममध्ये असतील. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क आहेत. (sanjay manjrekar will be back to tv commentary during india tour of australia)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी