नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने 33 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे प्लेऑफला जाण्याच्या मार्गावर संकट आलं आहे. तर दूसरीकडे राजस्थानच कर्णधार संजू सॅमसनने परत एकदा चुकी केली असून त्याला (Sanju Samson) ला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. संजू परत एकदा आपल्या संघाची गोलंदाजी निर्धारित वेळेत पूर्ण करू शकलेला नाही. यामुळे त्याला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
आता जर राजस्थान संघ पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटला बळी पडला तर नियमांनुसार सॅमसनला एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल. सॅमसन व्यतिरिक्त, संघाच्या उर्वरित प्लेइंग इलेव्हनला 6 लाख किंवा त्यांच्या वैयक्तिक मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या वतीनं एक पत्रक प्रसिद्ध करत याविषयावर माहिती देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सकडून या स्पर्धेत दुसऱ्यांदा ही चूक घडली आहे. त्यामुळे त्यांना 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला निर्धारित वेळेमध्येच 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागतात, पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांनी हा नियम न पाळल्यानं आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सनं हा नियम दुसऱ्यांदा मोडला आहे. त्यामुळे या स्पर्धेत पुन्हा एकदा ती चूक केल्यास संजू सॅमसनला एका मॅचसाठी निलंबित केलं जाईल. तसंच त्याला 30 लाखांचा दंड भरावा लागेल.
आधीही पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा संघ स्लो ओव्हर रेटमुळे अडचणीत आला होता. यामुळे सॅमसनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आता सॅमसन आणि राजस्थान संघाकडून आगामी सामन्यांमध्ये मोठी चूक झाल्यास, त्यासाठी टीम सदस्याव्यतिरिक्त कर्णधाराला कठोर शिक्षा होऊ शकते.
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणे अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी, असा नियम होता, पण आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. शिवाय या 90 मिनिटांत टीमला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक टीमला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागेल.
दरम्यान, सामन्यांविषयी सांगायचे तर, सॅमसनने राजस्थानसाठी सर्वाधिक नाबाद 70 धावांचे योगदान दिले, दिल्लीसाठी एन्रीज नोर्जेने चार षटकांत 18 धावा देऊन दोन बळी घेतले. सॅमसनने मोठा संघर्ष दाखवला पण दुसरीकडे दुसरा कोणताही फलंदाज दमदार खेळ करू शकला नाही, ज्यामुळे राजस्थान संघ 20 षटकांत फक्त 121 धावा करू शकला. दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या होत्या. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने 33 धावा केल्या आणि त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. श्रेयस आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या, जो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.