वडिलांचे पैसे उडवते अशी टीका करणाऱ्या ट्रोलरला साराचे जबरदस्त उत्तर

IPL 2021
Updated Apr 19, 2021 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी साराने नुकताच आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर हे प्रकरण सुरू झाले.

sara tendulkar
वडिलांचे पैसे उडवते अशी टीका करणाऱ्या ट्रोलरला साराचे उत्तर 
थोडं पण कामाचं
  • सारा तेंडुलकरने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता
  • सचिनच्या या २३ वर्षीय मुलीने ट्रोलरला सडेतोड उत्तर देत तिची बोलती बंद केली.
  • सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचे हे आक्रमक रूप पाहून अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

मुंबई: सचिन तेंडुलकर((Sachin Tendulaka) ची मुलगी सारा तेंडुलकर(sara Tendulakar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, तिला ट्रोल करणाऱ्या एका युजर्सला या स्टार क्रिकेटर्सच्या मुलीने सडेतोड उत्तर दिले आहे.

खरंतर, सारा तेंडुलकरने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात तिच्या हातात कॉफी कप दिसत आहे. या फोटोवर निशाणा साधत एका महिला युजरने साराला ट्रोल केले. मात्र सचिनच्या या २३ वर्षीय मुलीने तिला सडेतोड उत्तर देत तिची बोलती बंद केली. सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एका कॉफी कपचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर एका महिला युजरने कमेंट केली होती की ती वडिलांचे पैसे पाण्यात घालवत आहेस. साराने ही कमेंट पाहिली आणि यावर तिने उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली. साराने लिहिले, कॅफीनवर खर्च केलेले पैसे वाया जात नाहीत. तर याला उलट योग्य जागी खर्च करणे म्हणतात. सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचे हे आक्रमक रूप पाहून अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

अर्जुन तेंडुलकरवरही साधला होता निशाणा

ज्या युझरने सारा तेंडुलकरवर कॉफीवर विनाकारण पैसे वाया घालवत असल्याची कमेंट केली होती. त्याच युजरने इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरही निशाणा साधला होता. यावर्षाच्या सुरूवातीला आयपीएल २०२१मध्ये झालेल्या क्रिकेटर्सच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. मुंबईने अर्जुनला त्याची बेस प्राईस म्हणजेच २० लाखांना खरेदी केले होते. अर्जुनने मुंबईसाठी यंदाच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्येही पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याने दोन सामने खेळले होते. दरम्यान, त्याला केवळ दोनच विकेट मिळवता आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी