Shikhar Dhawan : शिखर धवन घडवू शकतो इतिहास; १३ व्या सत्रात फटकावले होते सर्वाधिक चौकार

IPL 2021
Updated Apr 02, 2021 | 10:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shikhar Dhawan : शिखर धवनचं आयपीएल करिअर आतापर्यंत खूप चांगल राहिलं असून धवन सध्या दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधित्व करत आहे

Shikhar Dhawan can make history in IPL The highest number of fours was scored in the 13th session
आयपीएलमध्ये शिखर धवन करणार इतिहास  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या सलग दोन सामन्यांमध्ये धवनने शतक ठोकलं होतं.
  • धवनने आतापर्यंत दोन शतके आणि ४१ अर्धशतके केली आहेत.
  • आयपीएलमध्ये धवनच्या नावावर आतापर्यंत सर्वात जास्त चौकारांची नोंद

आयपीएल, नवी दिल्ली  :  शिखर धवनचं आयपीएल करिअर आतापर्यंत खूप चांगल राहिलं असून धवन सध्या दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. परंतु अनेक संघाकडून तो खेळलेला आहे. मागील सत्रात धवनने दिल्लीसाठी दमदार फलंदाजी केली होती. सलग दोन सामन्यांमध्ये धवनने शतक ठोकलं होतं. आयपीएलमधील  सलग दोन सामन्यात शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. यासह आयपीएल खेळात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाजही तोच ठरला. दरम्यान या हंगामातही शिखर धवन अजून एक पराक्रम आपल्या नावे करू शकतो, याची चर्चा सध्या होत आहे. धवन या आयपीएल सत्रात काय इतिहास घडवणार याची उत्कंठा सर्व क्रिकेट रसिकांना लागली आहे. 

क्रिकेटचा गब्बर घडवणार इतिहास

शिखर धवन या सत्रात काय इतिहास घडवू शकतो यांची चर्चा सध्या होत आहे. पण वाचकांनो तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही,  धवन या सत्रात काय विक्रम करेल याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीत देणार आहोत. हा विक्रम म्हणजे सर्वात जास्त चौकार मारण्याचा. शिखर धवन सर्वात जास्त चौकार मारणारा फलंदाज असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण या २०२१ च्या हंगामात धवन ६०० चौकार मारण्याचा विक्रम करू शकतो. आयपीएलमध्ये ६०० चौकारांसाठी धवनला फक्त ९ चौकार मारण्याची गरज आहे.  

धवनने १७६ सामान्यांमध्ये आतापर्यंत ५९१ चौकार मारले आहेत आणि सर्वात जास्त चौकार मारण्यामध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. आयपीएलच्या मागील सत्रात धवनने ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. धवनने या लीगमध्ये आतापर्यंत ३४.४१ च्या सरासरीनुसार ५१९७ धावा केल्या आहेत. धवनने  १२६.८७ च्या स्ट्राइक रेटने या धावा पूर्ण केल्या आहेत. 

आतापर्यंत शिखर धवनने दोन शतके आणि ४१ अर्धशतके केली आहेत. या लीगमध्ये धवनने एकूण १०८ षटकार लगावले आहेत. आयपीएलमध्ये त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद १०६ धावांची आहे. 


सर्वाधिक चौकार गब्बरच्या नावावर  

आयपीएलमध्ये धवनच्या नावावर आतापर्यंत सर्वात जास्त चौकारांची नोंद आहे. डेविड वार्नर ५१० चौकारांसह  दुसऱ्या नंबरवर आहे. तर १९२ सामान्यात ५०३ चौकार मारत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. याचबरोबर  ४९३ चौकार लगावत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्माने आतापर्यंत ४५८ चौकार मारले आहेत. या शर्यतीत रोहित शर्मा  सहाव्या स्थानी आहे, तर एमएस धोनी  ३१३ चौकार मारत १५ व्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी