Shikhar Dhawan Video | मुंबई : पंजाब किंग्स (Panjab Kings) आणि भारतीय संघाचा (Indian Team) सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या एका व्हिडीओमुळे खूप चर्चेत आहे. धवन सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने पोस्ट केलेली एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये शिखर धवनचे वडील त्याला लाथा-बुक्क्यानी मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Shikhar Dhawan was kicked by his father, watch the video).
अधिक वाचा : परिचारिकांचं आजपासून कामबंद आंदोलन
शिखर धवनने या व्हिडीओला सोशल मीडियावर शेअर केले आहे. शिखर धवनच्या मारहाणीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे की, गब्बरसोबत असे का होत आहे. मात्र शिखर धवनचे वडील त्याची थट्टा करत असल्याचे दिसून येत आहे.
शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवनचे वडील मोहिंदर पॉल धवन आपल्या मुलाला लाथ मारताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत. खर तर शिखर धवनचा संघ पंजाब किंग्स आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.
पंजाब किंग्जचा संघ आयपीएल २०२२ मधून बाहेर पडल्यानंतर शिखर धवन घरी पोहोचताच त्याचे वडील मोहिंदर पॉल धवनने आपला सर्व राग आपल्या मुलावर काढला. सोशल मीडियावर शिखर धवनचा हा व्हिडीओ पाहून सर्व चाहते त्याची मजा घेत आहेत. तर काही चाहते काही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.