IPL 2021 मधून बाहेर झाल्यानंतही श्रेयस अय्यरला मिळाले मोठे बक्षीस, न खेळताही मिळणार पूर्ण पगार

IPL 2021
Updated Apr 01, 2021 | 18:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shreyas Iyer: दिल्ली कॅपिट्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आगामी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. 

shreyas ayyer
IPL 2021 मधून बाहेर झाल्यानंतही श्रेयसला मिळाले मोठे बक्षीस 

थोडं पण कामाचं

  • दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आगामी आयपीएलमधून बाहेर झाला आहे. 
  • अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत खांद्याला दुखापत झाली होती
  • अय्यरला दिल्ली कॅपिटल्समध्ये न खेळूनही पूर्ण पगार मिळणार आहे. 

Shreyas Iyer IPL Salary: भले श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीग(Indian Premier League)2021 मध्ये खेळू सकणार नाही. असे असतानाही दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला पूर्ण पगार मिळणार आहे. अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती आणि यामुळे तो आगामी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या माहितीनुसार ८ एप्रिलला त्याच्यावर सर्जरी केली जाणार आहे. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्ससाठी वेळेत फिट होऊ शकणार नाही. इनसाईडस्पोर्ट मनीबॉलनुसार श्रेयस अय्यरला प्रत्येक सीझनमध्ये ७ कोटी रूपये मिळतात आणि प्लेयर इंश्युरन्स स्कीम अंतर्गत पूर्ण पगार मिळेल. 

काय आहे आयपीएल प्लेयर इंश्युरन्स

ही इंश्युरन्स पॉलिसी सर्व केंद्रीय अनुबंधित खेळाडूंसाठी आहे. या स्कीमची ओळख २०११मध्ये म्हणजेच आयपीएलच्या चौथ्या हंगामात करण्यात आली होती. हा निर्णय तत्कालीन बीसीसीआय सचिव श्रीनिवासन आणि भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला होता. जर एखादा खेळाडू दुखापती आणि अथवा एखाद्या दुर्घटनमुळे तसेच अन्य कारणामुळे आयपीएलमध्ये खेळण्यास उपलब्ध नसेल तर त्याला या इंश्युरन्स स्कीम अंतर्गत खेळाडूला नुकसानभरपाई दिली जाईल.

श्रेयस अय्यर कसा योग्य?

स्कीमनुसार जर एखादा खेळाडू राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दुखापतग्रस्त झाल्यास अथवा आयपीएलच्या सुरूवातीला आणि संपूर्ण सीझन बाहेर राहत असेल तर तो यास्कीमसाठी पात्र असतो. अय्यर भारतीय संघात खेळात असताना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. 

रक्कम कशी ठरवली जाते

खेळाडूला दिली जाणारी रक्कम ही एकूण रक्कम आणि किती सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही या आधारावर अॅडजस्ट केली जाते. उदाहरणासाठी जर रोहित शर्माच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याचे पुर्नवसन केले जाईल. त्याच्या बरे होण्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्याबद्दल सांगितले जाईल की आयपीएल २०२१मध्ये त्याचे कधी पुनरागमन होईल. याचा अर्थ मुंबई इंडियन्सचा कर्णधार कमीत कमी तीन ग्रुप लीग मॅच खेळू शकणार नाही. रोहित शर्माची आयपीएल २०२१मधील सॅलरी १५ कोटी रूपये आहे. त्याच्या एकूण संख्येनुसार त्याला सरासरीने पगार दिला जाईल. 

खेळाडूंच्या दुखापतीवर बीसीसीआयला कोण प्रतिक्रिया देते

भारतीय संघाचे फिजिओ आणि बीसीसीआयची मेडिकल टीम. जर एखादा खेळाडू आयपीएलमध्ये रिपोर्ट केल्यानंतर दुखापतग्रस्त झाल्यास ते फ्रेंचायजीचे फिजिओ आणि डॉक्टर मेडिकल रिपोर्ट जमा करता. जर एखादा खेळाड आयपीएलमध्ये रिपोर्ट केल्यानंतर स्पर्धेबाहेर गेल्यास त्याला मिळणारा मोबदला बीसीसीआय आणि संबधित आयपीएल फ्रेंचायजी बरोबर वाटतात. इशांत शर्मा, झहीर खान आणि आशिष नहराला बीसीसीआयकडून मोबदला मिळाला आहे कारण दुखापतग्रस्त झाल्यानंतर ते आयपीएलच्या हंगामाबाहेर गेले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी