IPL : हैदराबादने एका झटक्यात गमावले १०.७५ कोटी रूपये, या खेळाडूला खरेदी करून केली चूक

IPL 2022
Updated Apr 05, 2022 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएलच्या १५व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादने एका खेळाडूला मेगा लिलावात तब्बल १०.७५ कोटींना खरेदी केले होते. हा खेळाडू या हंगामात आतापर्यंत फ्लॉप राहिला आहे. 

nicholas ooran
IPL : हैदराबादने एका झटक्यात गमावले १०.७५ कोटी रूपये 
थोडं पण कामाचं
  • १०.७५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूची घाणेरडी कामगिरी
  • आयपीएलमध्ये सातत्याने ठरतोय फ्लॉप
  • SRHचा सलग दुसरा पराभव

मुंबई: आयपीएलच्या(ipl) १५व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचा(sunrisers hyderabad) संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. हैदराबादने आतापर्यंत २ सामने खेळले असून दोनही सामन्यांमध्ये त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. एसआरएचचा संघ आयपीएलमध्ये खूपच कमकुवत दिसत आहे. टीममध्ये मोठी मोठी नावे सामील आहेत मात्र असे असतानाही त्यांची कामगिरी काही मोठी होत नाही आहे. हैदराबादने या हंगामात एका खेळाडूला तब्बल १०.७५ कोटींना खरेदी केले होते. मात्र या खेळाडूनेही संघाला निराश केले आहे. हा खेळाडू सातत्याने फ्लॉप ठरत आहे..Sunrisers Hyderabad player nicholas pooran is in out of form in ipl 2022

अधिक वाचा - काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला

१०.७५ कोटींना खरेदी केलेला खेळाडू फ्लॉप

सनरायजर्स हैदराबादच्या संघाने मेगा लिलावात वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला मोठ्या किंमतीला खरेदी केले होते. त्यांनी निकोलस पूरनला १०.७५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. मात्र इतकी मोठी रक्कम खर्च करूनही हैदराबादला याचा फायदा मिळालेला नाही. निकोलस पूरन या हंगामात फ्लॉप दिसत आहे. त्याने आतापर्यंतच्या २ सामन्यांत केवळ ३४ धावा केल्यात. हंगामातील पहिल्या सामन्यात पूरन ०वर बाद झाला होता आणि एक लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात २४ बॉलमध्ये ३४ धावांची खेळी केली. 

२०२० पासून सातत्याने खराब कामगिरी

आयपीएल २०२२मध्ये सनरायजर्स हैदराबादने पहिल्या सामन्यात निकोलस पूरनला राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने घातक बॉलवर एलबीडब्लू केले होते. पूरनने एकूण ९ चेंडूंचा सामना केला आणि तो शून्यावर बादा झाला होता. निकोलस पूरन २०२०च्या आयपीएलमध्येही ६ वेळा शून्यावर बाद झाला. २०२० पासून कोणताही फलंदाज इतक्या जास्त वेळा शून्यावर बाद झालेला नाही. 

अधिक वाचा - सनी लियोनीचा तो व्हिडिओ व्हायरल, पतीसोबतचा जबरदस्त मुकाबला

हैदराबादची लिलावात मोठी चूक

मेगा लिलावात पूरनची बेस प्राईज १.५ कोटी होती. त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी उत्सुकता दाखवला होती. हैदराबादने १०.७५ कोटी खर्च करत पूरनला खरेदी केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी