IPL 2022: ४ वर्षे बेंचवर बसून होता, एक संधी मिळताच झाला स्टार

IPL 2022
Updated Apr 29, 2022 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 मध्ये एका खेळाडूला तब्बल ४ वर्षांनी खेळण्याची संधी मिळाली आहे. हा खेळाडू २०१७पासून आयपीएलमध्ये निवडला जात होता. अखेर चार वर्षांनी त्याला खेळण्याची संधी मिळतेय. 

sunrisers hyderabad
IPL : ४ वर्षे बेंचवर बसून होता, एक संधी मिळताच झाला स्टार 
थोडं पण कामाचं
  • शशांकने २०१७ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये संधीची वाट पाहिली आहे.
  • त्याने ९ एप्रिलला सीएसकेविरुद्ध डेब्यू केले होते मात्र त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
  • बुधवारी त्याला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली

मुंबई: सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात ते काही खोटं नाही. ही म्हण सनरायजर्स हैदराबादचा(sunrisers hyderabad) युवा क्रिकेटर शशांक सिंहला(shashank singh) तंतोतंत लागू पडते. शशांकने २०१७ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) संधीची वाट पाहिली आहे. त्याने ९ एप्रिलला सीएसकेविरुद्ध(csk) डेब्यू केले होते मात्र त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. अखेर बुधवारी त्याला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली असता ३० वर्षीय फलंदाजांने आपल्या खेळाने क्रिकेट जगताला हैराण केले. 

अधिक वाचा - ऐकावं ते नवलच! फक्त २९ व्या वर्षी करोडपती झाली मुलगी

शशांकची एकाच सामन्यात हवा

१८ ओव्हर्सनंतर सनरायजर्स हैदराबादने गुजरातविरुद्ध १६० धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांना सन्मानजनक धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र उजव्या हाताचा फलंदाज शशांक सिंहने आयपीएल २०२२च्या आपल्या पहिल्या डावात जोरदार बॅटिंग केली. छत्तीसगडच्या या फलंदाजाने तीन सिक्स लगावले आणि त्याने ६ बॉलमध्ये ४१६.६७च्या सरासरीने २५ धावा केल्या.

जबरदस्त फलंदाजीने जिंकली मने

शशांक सिंहच्या विस्फोटक फलंदाजीमुळे हैदराबादने ६ बाद १९५ धावा केल्या. शशांक या सामन्यात २५ धावांवर नाबाद राहिला. यात त्याने एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याच्या या गोलंदाजीचे हरभजन सिंहसह अनेक माजी क्रिकेटर्सनी कौतुक केले. २१ नोव्हेंबर १९९१मध्ये जन्मलेला शशांक सिंहने २०१५- १६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये १० डिसेंबर २०१५मध्ये मुंबईसाठी लिस्ट ए सामन्यात डेब्यू केले होते. 

अधिक वाचा - पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा

४ वर्षांपासून आहे बेंचवर

त्याला दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएल २०१७साठी १० लाखांत निवडले होते. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१८मध्ये शशांकला आयपीएल २०१९च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सकडून निवडण्यात आले. त्याने २०१९मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगडसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केले. शशांकने आतापर्यंत ९ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४३.६०च्या सरासरीने ४३८ धआवा केल्यात. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. २३ लिस्ट ए सामन्यांत शशांकने २९.७७च्या सरासरीने ५३८ धावा केल्यात. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी