SRHvRCB: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजयी लय कायम राखणार विराट सेना?

IPL 2021
Updated Apr 14, 2021 | 14:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Preview: आज आयपीएल २०२१मधील सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात टक्कर होत आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू

virat kohli
सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजयी लय कायम राखणार विराट सेना? 

थोडं पण कामाचं

  • पडीक्कल जर बुधवारीही खेळला नाही तर आरसीबीसाठी कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर डावाची सुरूवात करतील.
  • या सामन्यात विराटची सेना आपली विजयी मालिका कायम राखण्याचा प्रयत्न करणार.
  • डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हरवले होते.

चेन्नई: आयपीएलच्या(indian premier league 2021) १४व्या हंगामाची विजयी सुरूवात करणाऱ्या विराट कोहलीच्या(virat kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) संघाचा सामना आज सनरायजर्स हैदराबादशी(sunrisers hyderabad) होत आहे. या सामन्यात विराटची सेना आपली विजयी मालिका कायम राखण्याचा प्रयत्न करणार. आरसीबीने आपल्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवले होते. तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हरवले होते. पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर त्यांचा फलंदाज देवदत्त पडीक्कल याचे पुनरागमनही असेल. 

पडीक्कल आता कोरोनामधून फिट होऊन आला आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. त्याला २२ मार्चला कोरोना झाला होता. त्यानंतर तो क्वारंटाईनमध्ये होता. 

डे व्हिलियर्स आणि कोहलीवर आरसीबीची मदार

पडीक्कल जर बुधवारीही खेळला नाही तर आरसीबीसाठी कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर डावाची सुरूवात करतील. आरसीबीच्या येणाऱ्या सामन्यांमध्ये मोहम्मद अझरुद्दीन आणि ऑस्ट्रेलिया लेग स्पिनर अॅडम झाम्पा यांना संधी दिली जाऊ शकते. आरसीबीसाटी फलंदाजीची मदार एबी डेव्हिलियर्स आणि कोहलीवर असेल. तर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलही स्वत:ला सिद्ध करू शकतो 

हर्षल पटेलकडून विराट सेनाला अशा

कर्नाटकच्या २० वर्षीय क्रिकेटर पडीक्कलने गेल्या सत्रात १५ सामन्यांमध्ये संघासाठी सर्वाधिक ४७३ धावा केल्या होत्या. आपल्या पहिल्या सत्रात त्याने पाच अर्धशतक ठोकले होते. यानंतर सय्यद मुश्ता अली ट्रॉफीमध्ये सहा सामन्यात २१८ आणि विजय हजारे ट्रॉफीमधील ७ सामन्यांमध्ये ७३७ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर रजत पाटीदार आणि सुंदर सनरायजर्सविरुद्ध आपले योगदान देण्याचा प्रयत्न करतील.

 

असे असतील दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, फिन एलेन, एबी डे व्हिलियर्स, पवन देशपांडे, वाशिंग्टन सुंदर, डेनियल सॅम्स, युझवेंद्र चहल, अॅडम झाम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरूद्दीन, काइल जैमीसन, डेनियल क्रिस्टियन, सुयश प्रभुदेसाई , के एस भरत

सनरायजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, विराट सिंह, मनीष पांडे, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थम्पी, शाहबाज़ नदीम आणि मुजीब उर रहमान


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी