हैदराबादचा चार धावांनी विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 07, 2021 | 01:53 IST

आयपीएलच्या ५२व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी विजय झाला.

Sunrisers Hyderabad won by 4 runs against Royal Challengers Bangalore
हैदराबादचा चार धावांनी विजय 

थोडं पण कामाचं

  • हैदराबादचा चार धावांनी विजय
  • हैदराबादचा केन विल्यमसन मॅन ऑफ द मॅच
  • विल्यमसनने ३१ धावा केल्या तसेच दोघांना कॅच आऊट आणि एकाला रन आऊट केले

अबुधाबी: आयपीएलच्या ५२व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी विजय झाला. हैदराबादला प्ले ऑफ राउंडची आणखी एक मॅच खेळायची आहे. या मॅचचा निकाल काहीही लागला तरी हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान प्ले ऑफ राउंडमध्येच संपणार आहे. तर हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव होऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुढच्या फेरीत खेळणार आहे. Sunrisers Hyderabad won by 4 runs against Royal Challengers Bangalore

अबुधाबीत झालेल्या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बंगळुरूने हैदराबादला २० ओव्हरमध्ये सात बाद १४१ या धावसंख्येवर थोपवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरूला वीस ओव्हरमध्ये सहा बाद १३७ धावा एवढीच मजल मारता आली. यामुळे हैदराबादचा चार धावांनी विजय झाला. हैदराबादचा केन विल्यमसन मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने २९ बॉल खेळून चार फोर मारत ३१ धावा केल्या. तसेच उत्कृष्ट फिल्डिंग करुन बंगळुरूच्या डॅन ख्रिस्तिअन आणि शाहबाझ अहमद या दोघांना कॅच आऊट तर  ग्लेन मॅक्सवेलला रन आऊट (धावचीत) केले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून जेसन रॉयने ४४, अभिषेक शर्माने १३, केन विल्यमसनने ३१, प्रियम गर्गने १५, अब्दुल समदने १, वृद्धिमान साहाने १०, जेसन होल्डरने १६, राशिद खानने नाबाद ७ धावा केल्या. बंगळुरूच्या हर्षल पटेलने ३, डॅन ख्रिस्तिअनने २, जॉर्ज गार्टनने १ आणि युझवेंद्र चहलने १ विकेट घेतली.

बंगळुरूकडून विराट कोहलीने ५, देवदत्त पडिक्कलने ४१, डॅन ख्रिस्तिअनने १, के. एस. भारतने १२, ग्लेन मॅक्सवेलने ४० (रन आऊट/धावचीत), एबी डीविलिअर्सने नाबाद १९, शाहबाझ अहमदने १४, जॉर्ज गार्टनने नाबाद २ धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिक, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर आणि राशिद खान या पाच बॉलरनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पॉइंट्स टेबल

आयपीएल खेळणाऱ्या सर्व आठ टीमची प्ले ऑफ राउंडची प्रत्येकी एक मॅच व्हायची आहे. प्रत्येक टीमच्या आतापर्यंत १३ मॅच खेळून झाल्या आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्स (२० गुण) पहिल्या, चेन्नई सुपरकिंग्स (१८ गुण) दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१६ गुण) तिसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्स (१२ गुण) चौथ्या, मुंबई इंडियन्स (१२ गुण) पाचव्या, पंजाब किंग्स (१० गुण) सहाव्या, राजस्थान रॉयल्स (१० गुण) सातव्या, सनरायझर्स हैदराबाद (६ गुण) आठव्या स्थानावर आहे. दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या तीन टीम पुढील फेरीसाठी पात्र झाल्या आहेत. पुढील फेरीची चौथी टीम निश्चित व्हायची आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता आणि मुंबई यांच्यात झुंज आहे.

कोलकाताची शेवटची मॅच राजस्थान विरोधात तर मुंबईची शेवटची मॅच हैदराबाद विरोधात आहे. कोलकाताची मॅच सात ऑक्टोबरला शारजात होईल. मुंबईची मॅच आठ ऑक्टोबरला अबुधाबीत होईल. आपापल्या शेवटच्या मॅच कोलकाता आणि मुंबईने जिंकल्या तर उत्तम रनरेटच्या जोरावर एक टीम पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. सध्या रनरेटच्या बाबतीत कोलकाताचे पारडे जड आहे. यामुळे मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी हैदराबादला मोठ्या फरकाने हरवण्याचे आव्हान असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी