IPL 2022: एकीकडे धोनीचे जहाज बुडतेय, तर रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली, पाहा Video

IPL 2022
Updated May 13, 2022 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

CSK vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ सर्वबाद ९७ धावा केल्या. सीएसकेचे जहाज बुडताना पाहून युवराज सिंह आणि सुरेश रैनानेही खिल्ली उडवली. 

csk vs mi
पाहा Video, रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली  
थोडं पण कामाचं
  • सीएसकेचा संपूर्ण संघ १०० धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही.
  • या दरम्यान हे दृश्य स्टेडियममध्ये बसून युवराज सिंह आणि सुरेश रैनाही पाहत होते.
  • या दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई: आयपीएल २०२२मध्ये(Ipl 2022) सीएसके(csk) आणि मुंबई इंडियन्स(mumbai indians) यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता. हा सामना मुंबईने ५ विकेटनी जिंकला. मुंबईच्या संघासाठी हा सामना जिंकणे सीएसकेच्या फलंदाजीनंतर खूपच सोपे झाले होते. सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९७ धावा केल्या होत्या. सीएसकेचे जहाज बुडताना पाहून माजी क्रिकेटर युवराज सिंग(yuvraj singh) आणि सुरेश रैना(suresh raina) यांनी चांगलीच मजा घेतली. suresh raina and yuvraj singh make fun of csk, watch video

अधिक वाचा - छोटा शकीलच्या दोन सहकाऱ्यांना अटक

युवराज-रैनाने उडवली खिल्ली

सीएसकेचा संपूर्ण संघ १०० धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. या दरम्यान हे दृश्य स्टेडियममध्ये बसून युवराज सिंह आणि सुरेश रैनाही पाहत होते. या दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंततर जसे सीएसकेचा संघ ९७ धावांवर ऑलआऊट झाला तेव्हा युवराज सुरेश रैनाला ट्रोल करताना दिसला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. 

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की जसे सीएसकेचा संघ छोट्या स्कोरवर बाद होतो तेव्हा रैनाजवळ बसलेला युवराज सिंग त्याला म्हणाला, आज तुमचा संघ ९७ धावांवर ऑलआऊट झाला. तुम्ही काय सांगाल...यावर उत्तर देताना रैनाने सांगितले, मी या सामन्यात खेळत नाही आहे नाही ना. त्यानंतर दोघेही हसू लागले.  युवराज आणि रैना दोघेही या सामन्यादरम्या स्टेडियममध्ये होते आणि एका फॅनने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल केला. 

अधिक वाचा - मध्य रेल्वेवरील एसी लोकलचे पाहा संपूर्ण टाइम टेबल

सीएसके प्लेऑफमधून बाहेर

मुंबईविरद्ध ५ विकेटनी पराभव झाल्यानंतर सीएसके प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. मुंबईचा हा या हंगामातील तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ते सहा अंकांसह शेवटच्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स ८ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी