IPL२०२०मधून अचानक बाहेर पडल्याबद्दल सुरेश रैना म्हणाला- ‘मुलांपेक्षा महत्वाचे काहीही नाही’

IPL 2020
Updated Aug 30, 2020 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suresh Raina: चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज सुरेश रैना शनिवारी अचानक भारतात परतला आणि उर्वरित आयपीएलमध्ये तो सहभागी होणार नाही. सीएसकेने घोषणा केली आहे की रैना वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे.

Suresh Raina
सुरेश रैनाने वैयक्तिक कारणांमुळे IPL२०२०मधून आपले नाव घेतले मागे 

थोडं पण कामाचं

  • सुरेश रैनाने वैयक्तिक कारणांमुळे IPL२०२०मधून आपले नाव घेतले मागे
  • सीएसकेने शनिवारी या बातमीची पुष्टी केली आणि रैनाचे समर्थन केले
  • सुरेश रैनाने IPL२०२०मधून माघार घेतल्याबद्दल म्हटले की मुलांपेक्षा महत्वाचे यावेळी काहीही नाही

नवी दिल्ली: चेन्नई सुपरकिंग्स फ्रँचाईजीने (Chennai Super Kings franchise) शनिवारी असं वृत्त दिलं की, सुरेश रैना वैयक्तिक कारणांनी भारतात परतत (Suresh Raina returns to India for personal reasons) आहे आणि उर्वरित आयपीएलमध्ये तो खेळणार नाही (unavailable for remaining IPL 2020), तेव्हा सीएसकेला मोठा धक्का (big blow to CSK) बसला. इतक्या वर्षांत सुरेश रैना चेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजीच्या क्रमाचा प्रमुख भाग (Suresh Raina important part of batting line) आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या रैनाने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला (announced retirement from international cricket on 15th August) होता आणि आयपीएलबद्दल उत्सुकताही दाखवली (eager for IPL) होती.

सुरेश रैनाने वैयक्तिक कारणांमुळे IPL२०२०मधून आपले नाव घेतले मागे

एका बातमीनुसार सुरेश रैना शनिवारी यूएईवरून दिल्लीला पोहोचला आणि स्वतःला घरी क्वारंटाईन केले. सीएसकेसाठी रैनाची गैरहजेरी हा मोठाच धक्का असणार आहे कारण रैना सर्वाधिक रन बनवण्यात आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाला आपल्या मुलांची बरीच काळजी वाटली आणि यामुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. रैनाची मुलगी गार्सिया आणि मुलगा रियो आहे.

सुरेश रैनाने म्हटले की मुलांपेक्षा महत्वाचे काहीही नाही

सुरेश रैनाने आयपीएल २०२०मधून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल दैनिक जागरणशी बोलताना सांगितले की मुलांपेक्षा महत्वाचे काहीही नाही. चेन्नई सुपरकिंग्समध्ये दोन खेळाडूंसह १३ सदस्य कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. खेळाडूंमध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड हे पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे. रैनाला यूएईत असताना खूप काळजी वाटत होती कारण सीएसकेच्या संघात कोव्हिड-19ची प्रकरणं वाढत होते. फ्रँचाईजीने रैनाच्या निर्णयाचा आदर राखत त्याला जाऊ दिले.

सुरेश रैनाच्या काकांचाही नुकताच झाला आहे मृत्यू

सुरेश रैनाला काही काळापूर्वीच आपल्या काकांच्या मृत्यूचे दुःखही पचवावे लागले होते. त्याच्या काकांवर हल्ला झाला होता आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १९ ऑगस्टची आहे. रैनाचे काका ५८ वर्षांचे होते. त्यांना डोक्याला अनेक जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर दोन सदस्यांनाही दुखापत झाली आहे.  

सीएसकेचे सीईओ काशी विश्वानाथ यांनी सांगितले की फ्रँचाईजी लवकरच रैनाच्या विकल्पावर विचार करणार नाही. सीएसकेचे खेळाडू ६ सप्टेंबरपर्यंत विलगीकरणात राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी