मुंबई: आयपीएलच्या(ipl) स्पर्धेत तब्बल पाच वेळा जेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचा(mumbai indians) आयपीएल २०२२मधील प्रवास हा भयानकच आहे. या संघाला तब्बल ८ सामन्यांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले आहे. रोहित शर्मा(rohit sharma) फ्लॉप कामगिरी करत आहे. तर त्याने नेतृत्वही चांगले होत नाही आहे. अशातच मुंबई इंडियन्सकडे असा एक खेळाडू आहे जो रोहितची जागा घेऊ शकतो. suryakumar yadav can replace rohit sharma for mumbai indians captain
अधिक वाचा - डायबिटीजच्या रूग्णांसाठी शुगर वाढणे ठरू शकते धोकादायक
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ ८ सामने हरल्याने प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. पुढील हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवले जाऊ शकते. रोहित शर्मा भारताच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार आहे. अशातच त्याच्यावर कामाचे प्रेशर अधिक आहे. सूर्यकुमार ादव आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचा एकमेव फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून धावा निघत आहेत.
सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav)ला मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सने रिटेन केले होते. जर सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवले गेले तर तो दीर्घकाळ ही जबाबदारी सांभाळू शकतो. आयपीएल २०२२मध्ये ६ सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने ४७.८०च्या सरासरीने २३९ धावा केल्यात.
अधिक वाचा - वजन घटविण्यासाठी उपयुक्त मसाला वापरण्याच्या ४ पद्धती
सूर्यकुमार यादव २०१२पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. त्याने केकेआरच्या संघासाठीही क्रिकेट खेळला आहे. सूर्याने आपल्या जीवावर मुंबईला अनेक सामने जिंकून दिलेत. सूर्याने आयपीएलच्या १२१ सामन्यांमध्ये २५८० धावा केल्या आहेत.त्याच्याकडे क्षमता आहे की तो कोणत्याही पिचवर धावा करू शकतो. अशाकच सूर्यकुमार यादव रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनण्यासाठी सर्वात मोठा दावेदार आहे.