सूर्यकुमार यादवने विराट कोहलीची ही चूक केली नजरेआड, आणि...

IPL 2020
Updated Nov 19, 2020 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vira Kohli’s training video: आयपीएल २०२०मध्ये एका सामन्यादरम्यान विराट कोहलीने सूर्यकुमार यादवबद्दल प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला होता. सूर्यकुमार यादव यावेळी फलंदाजी करत होता.

Suryakumar Yadav and Virat Kohli
सूर्यकुमार यादवने विराट कोहलीची ही चूक केली नजरेआड, भारतीय कर्णधाराच्या पोस्टवर केली कॉमेंट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीच्या वर्तणुकीबद्दल त्याच्यावर झाली होती टीका
  • चेंडू दाखवत सूर्यकुमारच्या जवळ आला होता कोहली
  • ‘मी उत्तम खेळ पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’

आयपीएल २०२०चे (IPL 2020) विजेतेपद (championship) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाला मिळवून देण्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) महत्वाची भूमिका (peculiar role) पार पाडली. त्याने अनेक सामन्यात मुंबई संघाची झालेली पडझड भरून (brought team out of crisis) काढली. असाच एक सामना त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील (captaincy) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) संघाविरुद्ध खेळला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला (won victory for team) होता.

विराट कोहलीच्या वर्तणुकीबद्दल त्याच्यावर झाली होती टीका

या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ३ षट्कारांसह नाबाद ७९ धावा काढल्या होत्या. सूर्यकुमारच्या या खेळीदरम्यान विराट कोहली त्याच्याशी वाद घालताना दिसा होता ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली होती. कोहली लांबून चालत सूर्यकुमारच्या जवळ आला आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागला. पण सूर्यकुमारने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

चेंडू दाखवत सूर्यकुमारच्या जवळ आला होता कोहली

या सामन्यात १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगलोरने मुंबईच्या तीन महत्वाच्या गोलंदाजांना ७२ धावांमध्ये तंबूत परत धाडले होते. बेंगलोरच्या संघाला विजयाची आशा होती आणि ते आक्रमक पवित्रा घेऊन मुंबईच्या संघाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होते. पण सूर्यकुमारने त्यांच्या आशेवर पाणी ओतले. सूर्यकुमार यादव ४० धावांवर खेळत असताना कोहली चेंडू दाखवत सूर्यकुमारच्या जवळ आला आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागला. मात्र असे वाटत आहे की सूर्यकुमारने त्याची ही चूक नजरेआड केली आहे. त्याने नुकतीच विराट कोहलीच्या एका ट्वीटवर कॉमेंट केली आहे जी वेगाने व्हायरल होत आहे.

‘मी उत्तम खेळ पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’

भारतीय कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर ट्रेनिंग सेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसत आहे कोहली जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सराव करत आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मला कसोटी क्रिकेटची सराव सत्रे आवडतात.’ या ट्वीटवर कॉमेंट करत सूर्यकुमार यादवने लिहिले आहे, ‘एनर्जी, साऊंड, मी उत्तम खेळ पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.’

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे जिथे त्यांना ३ एकदिवसीय सामने, ३ टी-20 सामने आणि ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात स्थान मिळाले नाही.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी