टी २० क्रिकेटचा समावेश ऑलिंपिकमध्ये व्हायला हवा - द्रविड

t20 cricket should be included in olympics says rahul dravid टी २० या क्रिकेटच्या प्रकाराचा समावेश ऑलिंपिक स्पर्धेत व्हायला हवा, असे मत भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याने व्यक्त केले.

t20 cricket should be included in olympics says rahul dravid
भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविड 

थोडं पण कामाचं

  • टी २० क्रिकेटचा समावेश ऑलिंपिकमध्ये व्हायला हवा - द्रविड
  • टी २० स्पर्धा ऑलिंपिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढवू शकते
  • ऑलिंपिकमध्ये टी २० क्रिकेटचा समावेश झाल्यास हा खेळ रंजक करण्यासाठी आणखी विचार होईल

नवी दिल्ली: टी २० या क्रिकेटच्या प्रकाराचा समावेश ऑलिंपिक स्पर्धेत व्हायला हवा, असे मत भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याने व्यक्त केले. क्रिकेटचा वेग वाढवणारी टी २० स्पर्धा ऑलिंपिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढवू शकते, असेही राहुल द्रविड म्हणाला. (t20 cricket should be included in olympics says rahul dravid)

टॉस ते मॅचचा निकाल यासाठी साधारपणे चार तासांचा अवधी लागतो. दिवसभर चालणाऱ्या वन डे मॅचपेक्षा हा प्रकार आटोपशीर आणि उत्कंठावर्धक आहे. ऑलिंपिकमध्ये टी २० क्रिकेटचा समावेश झाल्यास हा खेळ अधिकाधिक रंजक करण्यासाठी आणखी विचार होऊ शकतो. शिवाय क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये वाढ होईल. क्रिकेटच्या प्रगतीला याचा लाभ होईल, असेही राहुल द्रविड सांगितले.

राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) मालकाच्या पुस्तकाचे प्रकाशन राहुल द्रविडने व्हर्च्युअल पद्धतीने केलले. याप्रसंगी बोलताना राहुल द्रविडने टी २० या क्रिकेटच्या प्रकाराचा समावेश ऑलिंपिक स्पर्धेत व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. कोरोना संकटाचे भान राखून संयुक्त अरब आमिराती येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचे (IPL) आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन यशस्वी झाले. ऑलिंपिकमध्ये टी २० क्रिकेटचा समावेश झाला तर तिथेही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. टी २० क्रिकेटच्या लोकप्रियतेत आणखी वाढ व्हावी यासाठी एक अनुभवी क्रिकेटपटू म्हणून मी शक्य तेवढे योगदान देणार आहे, असेही द्रविडने सांगितले.

याआधी १० नोव्हेंबर रोजी तेराव्या आयपीएल स्पर्धेची फायनल मॅच झाली. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यात आयपीएलचे पाचवे विजेतेपद जमा झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाच आयपीएल स्पर्धा जिंकल्या. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून १५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. सातत्याने एकाच टीमकडून सर्वोत्तम खेळी करणारा रोहित शर्मा हा खऱ्या अर्थाने आयपीएल स्टार प्लेअर झाला. फायनलमध्ये कॅप्टनला साजेशी खेळी करणाऱ्या रोहितने अर्धशतक झळकावले. त्याने ६८ धावा केल्या. फायनल मॅच ही रोहित शर्माची २००वी आयपीएल मॅच होती. या मॅचमध्ये विजय मिळवून देत पाचव्यांचा स्वतःच्या नेतृत्वात मु्ंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन करणारा रोहित शर्मा हा आयपीएलच्या तेरा सीझनमधील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन झाला.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे आयपीएल खेळणाऱ्या सर्व टीमनी सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. त्यांनी चांगली कामगिरी करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले हे समजून घेऊन तशी तयारी केली तर भविष्यात अन्य टीम चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ शकतील, असे राहुल द्रविड म्हणाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी