टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली 'या' दिवशी करणार मतदान

IPL 2019
Updated Apr 28, 2019 | 19:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीने आपलं वोटर आयडी कार्ड आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करुन याची माहिती दिली आहे.

Team India captain virat kohli to cast vote in Gurugram
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली 'या' दिवशी करणार मतदान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा सुद्धा लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली याने आपलं वोटर आयडी कार्ड इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच विराटने म्हटलं आहे की, "मी १२ मे रोजी मतदान करणार आहे, तुम्ही सुद्धा मतदानाला तयार आहात का?". विराट कोहलीने आधी आपल्या इंस्टाग्रामवर वोटर आयडीची पुढील आणि मागची बाजू दोन्ही शेअर केले होते. मात्र, खासगी माहिती लीक होऊ नये म्हणून कोहलीने ते फोटोज पुन्हा काढून टाकले. त्यानंतर विराटने पुन्हा इंस्टाग्राम स्टोरीवर वोटर कार्डच्या पुढील बाजूचा फोटो शेअर केला.

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा कॅप्टन असलेल्या विराट कोहलीचा जन्म दिल्लीत झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी विराट कोहली गुरूग्राम येथे शिफ्ट झाला. त्यामुळे विराटचं नाव गुरूग्राम येथील मतदार यादीत आहे. गुरूग्राम येथे १२ मे रोजी मतान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, विराटला या निवडणुकीत मतदान करणं थोडं कठीण जाण्याची शक्यता आहे. कारण, विराट सध्या आयपीएलमध्ये बीझी आहे आणि त्याची टीम पॉईट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

सौजन्य: इंस्टाग्राम

विराटला आपल्या टीमला प्लेऑफ पर्यंत पोहोचवण्यासाठी अद्याप शिल्लक असलेल्या तिन्ही मॅचेस जिंकणं गरजेचं आहे. विराट कोहलीच्या नेत्रृत्वात आरसीबीच्या टीमने प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आणि त्यानंतर बंगळुरूची टीम फायनल पर्यंत मजल मारली तर विराटला मतदान करण्यात अडथळा येऊ शकतो. कारण, १२ मे रोजी फायनल मॅच आहे आणि त्याच दिवशी विराट कोहलीचं मतदान सुद्धा आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी सहाव्या टप्प्यात हरियाणातील गुरूग्राम येथे मतदान प्रक्रिया होणार आहे. याच ठिकाणी विराट कोहलीचं नाव मतदार यादीत आहे. सहाव्या टप्प्यात बिहारमधील ८, हरियाणातील १०, झारखंडमधील ४, मध्यप्रदेशात ८, उत्तरप्रदेशात १४, पश्चिम बंगालमध्ये ८, दिल्ली-एनसीआरमध्ये सात जागांसाठी मतदान होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी