टीम इंडियातून पत्ता कट झाल्यानंतरही सुधरला नाही हा खेळाडू, आता  IPL करिअरही संपणार?

IPL 2022
Updated Mar 30, 2022 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Manish pandey in poor form: अनेकदा बऱ्याच संधी मिळाल्यानंतरही खेळाडू आपल्या जुन्या चुकांमधून काही शिकत नाही.आधी सिलेक्टर्सनी या खेळाडूला भारतीय क्रिकेट संघातील खराब कामगिरीमुळे बाहेर काढले होते आणि आता आयपीएलमधूनही त्याची सुट्टी होऊ शकते. 

manish pandey
IPL: टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावरही सुधरला नाही हा खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • IPL मध्ये नाही चालली या क्रिकेटरची बॅट
  • लखनऊ सुपरजायंटने खरेदी करून केली चूक
  • अनेक दिवसांपासून  टीम इंडियातून बाहेर

मुंबई: भारताचा एक खेळाडू असा आहे ज्याचे करिअर अडचणीत सापडले आहे. टीम इंडियातून पत्ता कट झाल्यानंतर आता या खेळाडूचे आयपीएलमधील करिअरही संपलेले दिसत आहे. अनेकदा संधी मिळूनही हा खेळाडू आपल्या जुन्या चुकातून सुधरत नाही आहे. आधी सिलेक्टर्सनी या खेळाडूला भारतीय क्रिकेट संघातून खराब कामगिरीमुळे बाहेर केले होते आणि आता आयपीएलमधूनही त्याची सुट्टी होऊ शकते. 

अधिक वाचा - येड्यांच्या मागे लागली ईडी - सदाभाऊ खोत

संपू शकते या क्रिकेटरचे आयपीएल करिअर

टीम इंडियाचा खेळाडू मनीष पांडे सध्या खराब फॉर्मात आहे. त्याला अनेकदा संधी दिल्या गेल्या मात्र तो नेहमीच फ्लॉप ठरला. सिलेक्टर्सनी आधी मनीष पांडेचा भारतीय संघातून पत्ता कट केला आणि आता आयपीएलचा संघ लखनऊ सुपर जायंटही लवकर त्याची सुट्टी करू शकतो. आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंटच्या पहिल्या सामन्यात मिडल ऑर्डर फलंदाज मनीष पांडेने खूप वाईट कामगिरी केली होतो. मनीष पांडेने गुजरात टायटन्सविरुद्ध या सामन्यात ५ बॉलमध्ये केवळ ६ धावा केल्या. याआधी तो सनरायजर्स हैदराबादसाठी खेळत होता मात्र त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

लखनऊ सुपर जायंटने खरेदी करून केली चूक

मनीष पांडेला लखनऊ सुपरजायंटने ४.६ कोटी रूपयांना खरेदी करत मोठी चूक केली आहे. मनीष पांडेला आपल्या टीममध्ये सामील करणे लखनऊ सुपर जायंटला मोठी रिस्क ठरू शकते. मनीष पांडे या वेळेस मेगा लिलावात सनरायजर्स हैदराबादकडून रिजेक्ट करण्यात आला होता. कारण त्याने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली नव्हती. 

अधिक वाचा - कार घेण्याची Desire पूर्ण करण्यासाठी किती लागेल डाउनपेमेंट

लखनऊ सुपर जायंटचे मोठे नुकसान

मनीष पांडेच्या फ्लॉप फलंदाजीमुळे लखनऊ सुपर जायंटची मिडल ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.. यामुळे लखनऊ सुपरजायंटला गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल सामन्यात खूप नुकसान सोसावे लागले होते. या खेळाडूला एकेकाळी टीम इंडियाचे भविष्य मानले जात होते. मात्र आता त्याची बॅट शांत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी