VIDEO:IPL 2022चा पहिला सुपरमॅन, हवेत उडून घेतला कॅच

IPL 2022
Updated Mar 29, 2022 | 14:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल १५ हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या टीम सीफर्टने जबरदस्त कॅच पकडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

catch
VIDEO:IPL 2022चा पहिला सुपरमॅन, हवेत उडून घेतला कॅच 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२चा पहिला सुपरमॅन
  • दिल्लीच्या फिल्डरचा हैराण करणारा कॅच
  • DCने MIला ४ विकेटनी हरवले.

मुंबई: क्रिकेटमध्ये नेहमीच सामन्यादरम्यान एकापेक्षा एक कॅच पाहायला मिळतात. आयपीएलमध्ये दरवर्षी हैराणजनक कॅच पाहायला मिळतो. १५व्या हंगामातही असाच हैराण करणारा कॅच पाहायला मिळाला. हंगामातील दुसरा सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स(delhi capitals) आणि मुंबई इंडियन्स(mumbai indians) यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्या आला. या सामन्यात जबरदस्त कॅच पाहायला मिळाला. हा असा कॅच होता ज्याला कोणताही मॅच नव्हता. एक जबरदस्त कॅच होता. जर तुम्ही हा कॅच पाहिला नाही तर तुम्ही एका जबरदस्त कमाल बघायला मुकाल. team sefort catch in ipl 2022

IPL 2022चा पहिला सुपरमॅन कॅच

या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या डावाच्या १६व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा फिल्डर टीम सीफर्टने हवेत झेप घेत कॅच घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज ऑलराऊंडर किरेन पोलार्डचा कॅच सीफर्टने पकडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय १६व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव बॉलिंग करत होता आणि ५व्या बॉलवर किरेन पोलार्डने मिडविकेटच्या दिशेने वेगाने शॉट खेळला. मात्र बॉलला जास्त उंची मिळाली नाही आणि सीफर्टने हवेत झेप घेत जबरदस्त कॅच घेतला. 

पाहा या कॅचचा व्हिडिओ

टीम सीफर्टचे करिअर

टीम सीफर्टकडे आयपीएल खेळण्याचा अनुभव जास्त नाही आहे. टीमने आयपीएलमध्ये या सामन्याच्या आधी केवळ २ सामने खेळले होते. त्याचा हा तिसरा सामना होता. या सामन्यात टीमने १४ बॉलमध्ये २१ धावांची खेळी केली यात त्याने ४ चौकार मारले. टीमने न्यूझीलंडसाठी ४० टी-२० सामने खेळले आहे यात त्याने २३.५३च्या सरासरीने ५८० धावा केल्या आहेत. टीम टी-२०मध्ये १२९.८३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात आणि २ अर्धशतकेही ठोकली आहेत. 

दिल्लीचा रोमहर्षक विजय

टीम सीफर्टच्या या कॅचने चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात पंतने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगला स्कोर केला. मुंबईने ५ बाद १७७ धावांचा स्कोर उभा केला. १७८धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने १३.२ ओव्हरमध्ये ६ बाद १०४ धावा केल्या होत्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी