मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये(ipl 2022) चेन्नई सुपर किंग्सची(chennai super kings) कामगिरी निराशाजनक राहिली.१० पैकी ७ सामन्यांत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. चेन्नई आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. संघाने या हंगामात दोन कर्णधाराांचा वापर केला. मात्र त्यानंतरही संघाची कामगिरी फ्लॉप ठरली. That was big mistake says virendra sehwag about dhoni
अधिक वाचा - ओव्यामुळे वजन कसे होईल कमी? इथे पाहा सोपा मार्ग
चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व आता महेंद्रसिंग धोनीच्या हातात आहे. नेतृत्वाच्या निर्णयावरून माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही विधान केले आहे आणि म्हटले आहे की चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सुरूवातीला सोडणे चुकीचा निर्णय होता.
सेहवाग म्हणाला, चेन्नई सुपर किंग्सची पहिली चूक ही होती की एमएस धोनीने हंगामाच्या सुरूवातीला नेतृत्व सोडले आणि रवींद्र जडेजाकडे नेतृत्व दिले. हा एक चुकीचा निर्णय होता. जर जडेजाला कर्णधार बनवण्यात आले तर त्याला संपूर्ण हंगामात नेतृत्व करायला हवे होते. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी घोषणा केली होती की एमएस धोनीने नेतृत्व सोडले आहे आणि एमएस धओनीने रवींद्र जडेजाला आपला उत्तराधिकारी निवडले आहे.
रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात संघाने खराब कामगिरी केली. या कारणामुळे स्पर्धेच्या मध्येच कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. एमएस धोनी पुन्हा कर्णधार बनलाआणि तो कर्णधार बनल्यानंतर संघाने एक सामना जिंकला तर दुसरा गमावला. चेन्नई सुपर किंग्सच्या खराब प्रदर्शनावर वीरेंद्र सेहवाग म्हणाला सुरूवातीला संघाचा प्लेईग ११ टीम ठीक नव्हती. ऋतुराजने सुरूवातीला धावा केल्या नाहीत. एमएस धोनीने केवळ एकच सामन्यात धावा करू शकला. धोनीने ज्या सामन्याला अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकवले तेव्हा संघ हरला होता.
अधिक वाचा - सलमान खान कोटीच्या कोटींचा मालक
चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मात्र यावेळेस संघ कमाल करू शकला नाही. गेल्या वर्षी चॅम्पियन ठरल्यानंतर यावेळेस चेन्नईला प्लेऑफही गाठता आली नाही.