IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये गरम झालेल्या वेडला BCCI ने केले गार, दिला गंभीर इशारा

Matthew Wade । सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यात वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाचा विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड केली.

The BCCI has issued a warning to Matthew Wade for vandalizing the dressing room
ड्रेसिंग रूममध्ये गरम झालेल्या वेडला BCCI ने केले गार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे.
  • ड्रेसिंग रूममध्ये गरम झालेल्या वेडला BCCI ने केले गार.
  • वेडवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप.

Matthew Wade । मुंबई : सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरूद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यात वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सच्या (GT) संघाचा विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडने (Matthew Wade) ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड केली. दरम्यान हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून बीसीसीआयने वेडला गंभीर इशारा दिला आहे. (The BCCI has issued a warning to Matthew Wade for vandalizing the dressing room). 

अधिक वाचा : या महिलेसोबत बोलण्यासाठीही तरसतात पुरूष, वाचा सविस्तर

BCCI ने मॅथ्यू वेडला दिला गंभीर इशारा

बीसीसीआयने मॅथ्यू वेडला आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ गुन्हेगार म्हणून धरले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने मॅथ्यू वेडला फटकारले असून वेडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

वेडवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप 

बीसीसीआयच्या आयपीएल समितीच्या म्हणण्यानुसार, "वेडने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ गुन्ह्यासाठी दोषी आणि शिक्षा ठोठावली आहे." आचारसंहितेच्या लेव्हल १ भंगासाठी सामन्याच्या पंचाचा निर्णय अंतिम असतो. 

LBW बाद दिल्याने चिघळला वाद 

लक्षणीय बाब म्हणजे विधानात उल्लंघनाचे कोणतेही कारण दिले गेले नाही, परंतु वेडला एलबीडब्ल्यू देणे वादग्रस्त होते आणि विराट कोहलीनेही त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. वेडला खात्री होती की ग्लेन मॅक्सवेलचा चेंडू त्याच्या पॅडवर आदळण्यापूर्वी त्याच्या बॅटला स्पर्श झाला होता आणि त्यामुळे त्याने आऊट दिल्यावर डीआरएसचा अवलंब करण्यास उशीर केला नाही. मात्र तरीदेखील निकाल त्याच्या बाजूने आला नाही. 

ड्रेसिंग रूममध्ये केली तोडफोड

दरम्यान, 'अल्ट्राज'मध्ये मात्र सगळे काही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे थर्ड अंपायर देखील मैदानावरील अंपायरच्या बाजूने गेले आणि त्यांनी वेडला बाद घोषित केले. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने नंतर डगआउट आणि नंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन आपला राग दाखवला आणि ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी