Arjun Tendulkar Place Mumbai Indians : मुंबई : आयपीएल (IPL) स्पर्धेत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians). तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकली आहे. परंतु यंदाच्या हंगामात (IPL 2022) मात्र सुरुवातीचे सलग 8 सामने गमावल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी नववा सामना जिंकला असून उर्वरीत सामनेही जिंकून शेवट किमान गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. यासाठी मुंबई संघात मोठ्या घडामोडी केल्या जात असून अर्जुन तेंडुलकरला यात संधी मिळण्याची शक्यता आहे. जर संधी मिळाली तर अर्जुनला भीम पराक्रम करुन सर्वाचं लक्ष त्यांच्या वळवावे लागणार आहे.
अधिक वाचा : नवनीत राणा हात जोडून आल्या जेलमधून बाहेर
दरम्यान मुंबईचा हेड कोच महेला जयवर्धने (mahela jayawardene) याने अर्जुनविषयी एक महत्त्वपूर्ण विधान यावेळी केलं आहे. महेला यावेळी बोलताना म्हणाला, 'सध्या तरी सामने गमावल्याने इतर सामने जिंकून आम्ही गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. याशिवाय उर्वरीत सामन्यात जिंकण्यासाठी संपूर्ण मेहनत करणार असून बेस्ट खेळाडू असलेला संघच आम्ही मैदानात उतरवू. जर अर्जून यातील एक असेल तर नक्कीच त्याला संधी मिळेल. पण अखेर हा निर्णय टीम कॉम्बिनेशनवर अवंलंबून असणार आहे.'
अधिक वाचा : हे ६ स्टार क्रिकेटर्स आधी बनले वडील नंतर केले लग्न
मागीस वर्षीही अर्जूनला मिळाली नव्हती संधी
आयपीएल 2021 मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसला अर्जुलना संघात घेतलं होतं. पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर यंदा आयपीएल 2022 च्या महालिलावात त्याच्या 20 लाख बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने 30 लाखांची बोली लावत त्याला विकत घेतलं. त्यामुळे यंदातरी त्याला संधी मिळणार का हे तरी पाहावं लागेल.
6 मे - गुजरात टायटन्स
9 मे - कोलकाता नाईट रायडर्स
12 मे - चेन्नई सुपरकिंग्स
17 मे - सनरायजर्स हैदराबाद
21 मे - दिल्ली कॅपिटल्स