हनी सिंहवर चालली IPL ची जादू, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल 

रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंह हे आजकाल खूपच चर्चेत आहेत. याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी आलेलं गाणं.

The magic of IPL on Honey Singh, the video is going viral
हनी सिंहवर चालली IPL ची जादू,  प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंह हे आजकाल खूपच चर्चेत आहेत.
  • हनी सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतो आहे.
  • या व्हिडिओत हनी सिंह आपल्या चाहत्यांना संदेश देताना म्हणत आहेत, की आज संध्याकाळी IPL च्या सामन्यात ते चक्क लाइव्ह परफॉर्म करताना दिसतील.

मुंबई : रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंह हे आजकाल खूपच चर्चेत आहेत. याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी आलेलं गाणं. मात्र आजचा नवाच चर्चेचा विषय आहे, त्यांचं क्रिकेटप्रेम, विशेषत: आयपीएल प्रेम. हनी सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओत हनी सिंह आपल्या चाहत्यांना संदेश देताना म्हणत आहेत, की आज संध्याकाळी IPL च्या सामन्यात ते चक्क लाइव्ह परफॉर्म करताना दिसतील. आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरमध्ये महत्वपूर्ण आईपीएल 2022 प्लेऑफ होणार आहे. यादरम्यान हनी सिंह स्टार स्पोर्ट्स पर लाइव होंगे।

व्हिडिओमध्ये हनी सिंग चाहत्यांना क्रिकेट लाइव्ह ऑन स्टार स्पोर्ट्स हिंदीमध्ये 25 मे रोजी संध्याकाळी 6:00 वाजता ट्यून करण्यासही सांगत आहेत. यासंदर्भाने सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये क्रेझ पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू'वर #honeysinghIPL ट्रेंड करू लागला.  


हनी सिंगने नुकतेच गायक गुरु रंधावासोबत 'डिजाइनर' गाणे केले आहे. यात दिव्या खोसला कुमारही दिसले आहे.

चाहते हनी सिंगचा हा व्हिडिओ उचलून धरत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी