MI vs PBKS । मुंबई : सध्या आयपीएलचा (IPL 2022) थरार रंगला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबईच्या संघाने आपले चारही सामने गमावले आहेत. नेहमीप्रमाणेच यंदाच्या हंगामात देखील रोहितच्या आर्मीची सुरूवात निराशाजनक झाली. मुंबईचा आजचा सामना मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्जविरूद्ध (MI vs PBKS) होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून कर्णधार रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार का हे पाहण्याजोगे असेल. (The match between Mumbai Indians and Punjab Kings will be played today at the MCA Stadium in Pune).
अधिक वाचा : ६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य
हा सामना मुंबईच्या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण पात्रता फेरीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघाला आज विजय मिळवणे गरजेचे आहे. कारण आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ असून देखील यंदा मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही.
आज १३ एप्रिल रोजी बुधवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज हा सामना होणार आहे. नेहमीप्रमाणे हा सामना ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. तर ७ वाजता नाणेफेक होईल. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.
अधिक वाचा : दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडे
मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ आहे. मात्र यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. लक्षणीय बाब म्हणजे मुंबई व्यतिरिक्त कोणत्याच संघाने हंगामातील पहिले चार सामने इतक्या वेळा गमावले नाहीत. २००८ च्या हंगामात देखील मुंबईच्या संघाने सलग ४ सामने गमावले होते. परंतु हंगामाच्या शेवटी संघाने पाचव्या क्रमांकावर मजल मारली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये देखील अशीच स्थिती होती. पहिले सामने गमावून देखील मुंबईच्या संघाने जोरदार कमबॅक केला आहे.
२०१५ च्या हंगामात देखील मुंबईच्या संघाने सुरूवातीचे ४ सामने गमावले होते. तेव्हा सर्वांना वाटत होते की मुंबईचा संघ पात्रता फेरी गाठू शकणार नाही मात्र मुंबईच्या संघाने सर्वांना खोटे ठरवले. संघाने जोरदार पुनरागमन करून फक्त पात्रता फेरीच गाठली नाही तर त्यावेळीच्या फायनलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.