Ajinkya Rahane IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा (IPL 2022) थरार रंगला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वच चित्र वेगळे पाहायला मिळत आहे. कारण ज्या दोन संघानी कधीकाळी आयपीएलवर वर्चस्व गाजवले ते मुंबई आणि चेन्नईचे संघ अद्यापही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान आयपीएलच्या १५ व्या हंगामातील १९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकातावर ४४ धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या संघाने कोलकाताला विजयासाठी २१६ धावांचे आव्हान दिले, मात्र या आव्हानांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १९.४ षटकात १७१ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात सर्वांचे लक्ष मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे होते मात्र तो चाहत्यांच्या अपेक्षेवर खरा उतरला नाही. (The trollers are saying that Ajinkya Rahane should retire due to poor performance).
अधिक वाचा : ऋषी कपूर यांच्या आठवनीने नीतू कपूर भावूक
लक्षणीय बाब म्हणजे सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेला दोनदा जीवनदान मिळून देखील तो साजेशी कामगिरी करू शकला नाही. तो केवळ ८ धावा करून बाद झाला. २१६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने ५४ धावांची खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अशा परिस्थितीत कमी स्ट्राईक रेटने खेळणारा अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.
यावेळी रहाणेला युजर्संनी चांगला स्ट्राईक रेट म्हणत डिवचले आहे. तसेच या स्ट्राईक रेटमुळे तू नक्कीच भारतीय संघात येऊ शकतोस अळा कोपरखळ्या देखील पाहायला मिळत आहेत. तर एका युजर्सने १३० धावांचे लक्ष्य असताना रहाणेला संघात घ्या असा हास्यास्पद सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याला आता निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.
आयपीएल मधील मराठमोळा चेहरा राजस्थानच्या संघाचा माजी कर्णधार आणि सध्या केकेआरच्या संघाचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेच्या बाबतीत सर्वांच्या मनात निराशा आहे. कारण नुकत्याच झालेल्या दिल्लीविरूध्दच्या सामन्यात रहाणेला पहिल्याच षटकात जीवनदान मिळाले तरी देखील तो या संधीचे सोने करू शकला नाही. यामध्ये दोन वेळा डीआरएसमुळे रहाणे वाचला आणि तिसऱ्या वेळी दिल्लीने अपीलच केली नसल्याने रहाणे खेळत राहिला. रहाणेने दिल्लीविरूध्दच्या सामन्यात १४ चेंडूमध्ये एका चौकारासह ८ धावा केल्या.