...तर मॅच खेळण्याआधीच मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मिटणार

IPL 2021
Updated Oct 07, 2021 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी आधीच प्लेऑफमधील स्थान निश्चित ेे आहे.

mumbai indians
...तर मॅच खेळण्याआधीच मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मिटणार 
थोडं पण कामाचं
  • कोलकात्याने राजस्थानला हरवले आणि त्यानंतर हैदराबादने मुंबईला हरवले तर केकेआर प्लेऑफमध्ये जेऊ शकतो. 
  • केकेआरला राजस्थानविरुद्ध विजय मिळवता आला नाही मात्र मुंबईने हैदराबादाला जरी हरवले तरी चौथ्या आणि पाचव्या स्थानावर जे संघ आहेत त्यांचे गुण समान असतील. 
  • दुसरीकडे मुंबईने जरी हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला असला तरी त्यांना प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी केकेआरला पराभूत व्हावचं लागेल. 

मुंबई: आयपीएलच्या स्पर्धेचा शेवट जसजसा जवळ येत आहे तशी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पॉईट्सटेबलवरून तर कोणता संघ बाजी मारणार हे अद्याप अनुत्तरितच आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी आधीच प्लेऑफमधील स्थान निश्चित ेे आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, मुंबईसाठी एक मोठा धोकाही आहे तो म्हणजे केकेआरचा रनरेट. केकेआरचा रनरेट मुंबईपेक्षा खूप पुढे आहे. त्यामुळे केकेआर रनरेटच्या द्वारे प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे मुंबईच्या आशा मात्र साफ मावळतील. 

असे आहे चित्र

  1. आज दोन सामने होणार आहेत. केकेआर आणि राजस्थान यांच्यात एक सामना तर दुसरा सामना सीएसके आणि पंजाब यांच्यात आहे. 
  2. कोलकात्याने राजस्थानला हरवले आणि त्यानंतर हैदराबादने मुंबईला हरवले तर केकेआर प्लेऑफमध्ये जेऊ शकतो. 
  3. केकेआरला राजस्थानविरुद्ध विजय मिळवता आला नाही मात्र मुंबईने हैदराबादाला जरी हरवले तरी चौथ्या आणि पाचव्या स्थानावर जे संघ आहेत त्यांचे गुण समान असतील. 
  4. केकेआरसाठी यामध्ये एक फायदा आहे चौथ्या स्थानासाठी जी शर्यत सुरू आहे त्यात केकेआरचा रनरेट सर्वाधिक आहे. त्यामुळे जर चार संघाचे गुण समान असले तर केकेआर प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. 
  5. दुसरीकडे मुंबईने जरी हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला असला तरी त्यांना प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी केकेआरला पराभूत व्हावचं लागेल. 
  6. मुंबईचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. मात्र त्यांचा रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे केकेआरचा पराभव झाल्यास मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. 
  7. दरम्यान, कोलकात्याने राजस्थानविरुद्धचा सामना जिंकला आणि मुंबईनेही हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला तर रनरेटच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी