IPL 2022 Final: ऐकलं का! तब्बल एवढ्या लोकांनी IPL ची फायनल थेट मैदानातून पाहिली

IPL 2022
Updated May 30, 2022 | 09:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 FINAL GT vs RR । रविवारी झालेल्या आयपीएल २०२२ च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगतदार रंगलेला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला.

There was a huge crowd at the Narendra Modi Stadium to watch the IPL final match between RR and GT
तब्बल एवढ्या लोकांनी IPL ची फायनल थेट मैदानातून पाहिली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२ चा किताब गुजरात टायटन्सने जिंकला.
  • गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएलवर आपले नाव कोरले.
  • IPL च्या फायनलचा सामना पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती.

IPL 2022 FINAL GT vs RR । अहमदाबाद : रविवारी झालेल्या आयपीएल २०२२ च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगतदार रंगलेला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या साखळी फेरीतील ७० आणि प्लेऑफच्या ३ सामन्यांनंतर या दोन संघांनी अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली. लक्षणीय बाब म्हणजे जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आयपीएलचा फायनलचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली होती. (There was a huge crowd at the Narendra Modi Stadium to watch the IPL final match between RR and GT). 

अधिक वाचा : व्लादिमीर पुतीन यांचा आधीच मृत्यू झाला-गुप्तचर यंत्रणा

सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी

दरम्यान, जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगची फायनल पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. आयपीएलने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या चाहत्यांची विक्रमी संख्या सांगितली आहे. राजस्थान रॉयल्सने यापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये जेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा म्हणजेच तब्बल १४ वर्षांनी राजस्थानच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र संघाला पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्यात अपयश आले. 

अनेक सेलिब्रेटींसह नेतेमंडळीची हजेरी 

लक्षणीय बाब म्हणजे आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने जेतेपद पटकावले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलच्या अधिकृत माहितीनुसार राजस्थान आणि गुजरात यांच्यातील आयपीएलच अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाख ४ हजार आणि ८५९ जण मैदानात उपस्थित होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटींसह नेतेमंडळी देखील उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. तर पंतप्रधानांच्या सुरेक्षेची काळजी म्हणून मैदानात तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.


हार्दिक आर्मीचा बोलबाला 

दरम्यान सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने २० षटकांत ९ बाद १३० धावा केल्या. सलामीवीर आणि ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर या सामन्यात आपल्या अर्धशतकापासून वंचित राहिला. मात्र आयपीएलच्या १५ व्या हंगामात राजस्थानच्या संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान जोसने पटकावला. एकूणच गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या कर्णधाराचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकांत ३ बळी पटकावून राजस्थानच्या फलंदाजीची कंबर तोडली. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने सांघिक खेळी करून विजय मिळवला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी